Narayan Rane Vs Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

सरवणकरांच्या भेटीनंतर राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले, मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त...

सदा सरवणकर माझे जवळचे सहकारी आहेत म्हणून त्यांची मी भेट घेतली, रविवारी जी घटना घडली त्याची दखल घेणं आमचं काम आहे.

Jagdish Patil

निवृत्ती बाबर -

मुंबई: गणपती विसर्जनावरून रविवारी मध्यरात्री मुंबईच्या प्रभादेवी येथे शिंदे गट आणि ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. शिंदे गटातील बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसैनिक (Shivsainik) भिडले होते.

या राड्यादरम्यान आमदार सदा सरवणकर यांनी फायरिंग केली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. शिवाय काल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दादर पोलिस स्टेशनमध्ये आमदार सदा सरवणकरांविरोधात (Sada Saravankar) तक्रार दिली असून त्यांना अटक करण्याची मागणी देखील केली आहे.

पाहा व्हिडीओ -

याच सर्व पार्श्वभूमीवर आज भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत असतानान नारायण म्हणाले, सदा सरवणकर माझे जवळचे सहकारी आहेत म्हणून त्यांची मी भेट घेतली, रविवारी जी घटना घडली त्याची दखल घेणं आमचं काम आहे.

तक्रार दिली आहे तर चौकशी करतील, फायरिंग झाली तर कळतं ना? शिवसेनेला (Shivsena) तक्रार केल्याशिवाय काही उरलं नाही. मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारींचे मार्केटिंग सूरू आहे. असले हल्ले बिल्ले करू नका शेवटी महाराष्ट्रात आणि मुंबईत राहायचं आहे असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला.

तसंच हा पार्टीचा विषय नाही, शिंदे आणि आमची युती आहे. आरोप कोणीही करतं, 50 लोक घराकडे मारायला पाठवतात. मुंबईत शिंदे गटाची ताकद आहे की नाही ते काळानुसार कळेल, आम्हाला ती ताकद कळली आहे. सत्तासंघर्षात उघड्या डोळ्यांनी ताकद कळेल. मुंबईत अशा प्रकारची लुटपुट चालू देणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, शिवाजी पार्कवर यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट घेणार आहे. तीच खरी शिवसेना आहे असंही राणे यांनी सांगितलं. राणे यांनी सरवणकरांची भेट घेतल्यानंतर शिवसेना खासदार राहुल शेवाळे आमदार सदा सरवणकर यांच्या भेटीला आले होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT