Adv Gunaratna was a dentist and he Had failed four times in college said Dr. Narendra Kale Saam Tv
मुंबई/पुणे

सदावर्ते डेंटिस्ट होते; कॉलेजात चार वेळा नापास झाले होते: डॉ. नरेंद्र काळे

Adv Gunratan Sadavarte Latest News: सदावर्तेंनी एसटी कामगारांमध्ये द्वेष भरून टोकाची भुमिका घ्यायला लावल्यामुळे, अनेक कर्मचार्‍यांनी आयुष्य संपवले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याप्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत एक नवी माहीती समोर आली आहे. सदावर्ते हे वकिल होण्यापूर्वी दंत चिकित्सक (डेंटिस्ट -Dentist) होते अशी माहिती डॉ. नरेंद्र काळे (Dr. Narendra Kale) यांनी दिली आहे. डॉ. नरेंद्र काळे आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे (Adv. Gunratan Sadavarte) औरंगाबादमधील शासकीय दंत महाविद्यालयात (Aurangabad Government Dental College) शिकले. डॉ. काळे हे महाराष्ट्र राज्य दंतपरिषद, मुंबईचे अध्यक्ष आहेत. तसेच ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP) डॉक्टर सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सदावर्ते हे औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या परीक्षेत सलग चार वेळा नापास झाले होते, त्यानंतर त्यांना दंत वैद्यकीय शिक्षणापासून Debar (प्रतिबंध) करण्यात आला असा दावा डॉ. काळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केला आहे. (Adv Gunaratna was a dentist and he Had failed four times in college said Dr. Narendra Kale)

हे देखील पहा -

डॉ. नरेंद्र काळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल अनेक खुलासे करत अनेक आरोपही केले आहे. सदावर्ते यांना दंत वैद्यकीय शिक्षणापासून Debar (प्रतिबंध) करण्यात आलं तेव्हा त्यांनी विचित्र आंदोलने केली, या आंदोलनासमोर नांगी टाकुन प्राधिकरणाचा Debar rule बदलून या सदावर्तेंवर अभ्यासक्रमासाठी लावलेले प्रतिबंध उठवण्यात आले असा दावा डॉ. काळे यांनी केला आहे. तसेच अट्टाहासाने मिळवलेले डेंटल कॉन्सिल चे प्रमाणपत्र रद्द करून पुढे सदावर्ते वकिल झाले असं डॉ. काळे म्हणाले.

सदावर्तेंच्या भाषणांवरही डॉ. काळे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, सदावर्तेंनी एसटी कामगारांमध्ये द्वेष भरून टोकाची भुमिका घ्यायला लावल्यामुळे, अनेक कर्मचार्‍यांनी आयुष्य संपवले. तसेच सदावर्तेंना पडद्याआड कुठुन तरी रसद असल्याशिवाय खा. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला करण्याची हिंमत होत नाही असं म्हणत त्यांनी सदावर्तेंना मदत करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

पुढे डॉ. काळे म्हणाले विकृत, भडक, द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींना किती प्रसिद्धी द्यायची याचा मिडीयाने ही विचार केला पाहिजे. टीआरपीच्या खेळात महाराष्ट्रातील राजकारणाची, विधायक आंदोलनाची प्रतिमा आपण मलीन करत आहोत ही जाणीव मिडीयाने ठेवली पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. त्याचप्रमाणे पवारांच्या सिल्व्हर ओक घरावरील हल्ल्याच्या वेळी नेहमी संवेदनशील असणाऱ्या खा. सुप्रिया सुळे यांच्या कणखरतेचे आणि संवेदनशीलतेचे दर्शन महाराष्ट्राला झाले असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंचं कौतुकही केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT