Dipak Kesarkar, Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

दीपक केसरकरांनी दिला आदित्य ठाकरेंना सल्ला; म्हणाले,' उद्धव ठाकरे यांच्याकडून...'

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर अमरावती येथे शिवसैनिकांनी (Shiv Sena) हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे शिवसैनिकांनी(Shiv Sena) हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले होते, यावेळी हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. यावर आता मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भ्याड हल्ले करणाऱ्यांना मी शिवसैनिक म्हणणार नाही. हल्ले करणाऱ्यांवर पोलीस योग्य कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. याअगोदर खासदार संजय राऊत चिथावणीखोर वक्तव्य करत होते, आता आमदार आदित्य ठाकरे चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत. त्यांना ही भाषा शोभत नाही. आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेजी यांच्याकडून कसे बोलावे हे शिकावे, असंही दीपक केसरकर म्हणाले.

आमदार संतोष बांगर यांच्या वाहणावर हल्ला

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर अमरावती येथे शिवसैनिकांनी (Shiv Sena) हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले होते, यावेळी हल्ला झाल्याचे बोलले जात आहे.

यावेळी शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला. शिवसैनिकांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देखील दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT