Aditya Thackeray Sabha Saam TV
मुंबई/पुणे

Aditya Thackeray News : 'मला पेंग्विन म्हणतात याचा मला आनंद...', आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Political News : भाजपच्या काही नेत्यांकडून होणाऱ्या वैयक्तिक टिप्पणीचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश कांबळे

Aditya Thackeray :

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून होणाऱ्या वैयक्तिक टिप्पणीचा आदित्य ठाकरेंनी समाचार घेतला आहे. इंडिया टुडेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मला बेबी पेंग्विन म्हणतात पण पेंग्विनने किती उत्पन्न दिले तेही बघा. पेंग्विन बघायला लोक गर्दी करत आहेत. तिकडे जाऊन बघा की पेंग्विन बघायला गर्दी आहे की चित्ता बघायला गर्दी आहे. फरक सर्वांना माहिती आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. (Political News)

मला पेंग्विन म्हणतात तर म्हणू द्या. मला त्याचा आनंद आहे. मागच्या 7 वर्षांत पेंग्विनकडून मिळालेलं उत्पन्न बघा. महानगरपालिकेला 50 खोके मिळवून दिले आहेत. मी तर पेंग्विनसारखा चालत नाही. या सरकारमध्ये पेंग्विनसारखं कोण चालतं ते मला माहित नाही, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला. (Latest Marathi News)

राज ठाकरे यांच्या सोबत जाणार का?

आगामी निवडणुकीत राज ठाकरेंसोबत जाणार का या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, जे आपल्या सोबत आहेत त्यांना पुढे घेऊन जायचं हा आमचा विचार आहे. जे देशासाठी सोबत येतील त्यांना पुढे घेऊन जायचे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: नाशिक महापालिकेत २०४ पदांसाठी मेगाभरती, दरमहा मिळवा १.१० लाख पगार; कुठे अन् कसा करायचा अर्ज?

७२ व्या मजल्यावर बोलावलं अन् ५ कोटींची लाच मागितली; मंत्री संजय शिरसाटांवर राऊतांचा खळबळजनक आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना...

Microwave Cleaning : मायक्रोवेव्ह आतून चिकट अन् तेलकट झालाय? फक्त ५ रुपयांची 'ही' ट्रिक वापरून नव्यासारखा चमकेल

Maharashtra News Live Update: पुण्यात एफडीएची मोठी कारवाई, इंडयूकेअर फार्मास्युटिकलचा परवाना रद्‌द

How to Reduce Cholesterol: फक्त 7 दिवसांत कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात लगेच करा हे 4 बदल

SCROLL FOR NEXT