Aditya Thackeray Saam Facebook
मुंबई/पुणे

Aditya Thackeray: जुन्या आणि आताच्या टेंडरमध्ये ३०० कोटींचा फरक कसा? आदित्य ठाकरेंचा आयुक्तांना पत्रातून सवाल

Aditya Thackeray On BMC : मुंबई महानगरपालिकेच्या कथित रस्ते महाघोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा सुरू केलाय. त्यांनी पुन्हा एकदा पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र लिहिले आहे.

Bharat Jadhav

Aditya Thackeray Question On South Mumbai Road Contracts :

रस्ते घोटाळ्यात एक कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट झाल्यानंतर आता दक्षिण मुंबईच्या रस्त्यांसाठी नवीन टेंडर महापालिकेने काढले आहे. या दोन्ही टेंडरममध्ये देण्यात आलेल्या खर्चामध्ये तफावत असून यावरून आदित्य ठाकरेंनी आयुक्तांना सवाल केलाय. जुन्या आणि आताच्या टेंडरमध्ये ३०० कोटींचा फरक कसा? असा सवाल आदित्य ठाकरेंनी पत्रातून केलाय. (Latest News)

मुंबई महानगरपालिकेच्या कथित रस्ते महाघोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा सुरू केलाय. त्यांनी पुन्हा एकदा पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान रस्त्यांची कामे कधी केली जाणार असाही प्रश्न पालिकेला एक्स वर पोस्टवर लिहित केला होता. आज त्यांनी रस्त्यांच्या कामांसाठी देण्यात आलेल्या टेंडरवर प्रश्न उपस्थित केलेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामाची निविदा पालिकेकडून काढण्यात आली आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासन आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय. निविदेत देण्यात आलेल्या खर्चातील तफावत पाहता त्यांनी पालिकेला प्रश्न केलाय. नवीन निविदेत निविदेची किंमत कमी कशी झाली आहे? ह्याचा अर्थ पहिल्या निविदेची किंमत जास्त होती, की ही किंमत कमी आहे?

Aditya Thackeray

या सध्याच्या निविदेसाठी पूर्वीच्या निविदेतील कुठले रस्ते/गल्या/ साईड स्ट्रिप्स वगळण्यात आल्या आहेत का? असाही सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. तसेच पूर्वीच्या कंत्राटदाराचा मुजोरपणा आणि कामांची पद्धत पाहता, महानगरपालिकेने सुरक्षा ठेव १% वरून १०% पर्यंत वाढवण्याची विनंती केलीय. आधीच्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. त्याचे नाव राष्ट्रीय वृत्तपत्रांमधे प्रसिद्ध करा आणि इतर प्रत्येक नागरी संस्थेला त्या कंत्राटदाराबद्दल माहिती द्या अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी पत्राद्वारे केलीय.

Aditya Thackeray

दरम्यान दक्षिण मुंबईतील रस्त्यांची कामे करण्यासाठी पालिकेने निविदा प्रसिद्ध केलीय. यात नव्या निविदेची किंमत १३६२ कोटी रुपये आहे. आधीच्या कॉन्ट्रॅक्टरचा घोटाळा समोर आल्यानंतर त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर आता नव्याने निविदात पालिकेने काढलीय.

काय म्हणालेत आदित्य ठाकरे

मी काल, सोमवारी ट्विटरवरून दक्षिण मुंबईतील रस्त्यांची कामे कधी सुरू केली जातील? असा प्रश्न विचारला. आता तातडीने दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रसिद्ध होत असल्याचे पाहून मला आनंद झाला. राज्यातील घटनाबाह्य राजवटीत झालेल्या ‘रस्ते मेगा घोटाळ्यातील’पूर्वीचा करार संपुष्टात आणल्यानंतर हे घडले असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. अखेर मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत, पण जानेवारी २०२४ पर्यंत वर्क ऑर्डर दिली जाणार नसल्यामुळे ‘टाइमलाइन’ बिघडलेली दिसत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

निविदा प्रसिद्ध झाली असली तरी, त्याचा तपशील पाहिल्यावर लक्षात आले की, मागील निविदेची किंमत १६७० कोटी रुपये होती आणि आता नव्या निविदेची किंमत १३२० कोटी रुपये आहे, म्हणजे जवळजवळ ३०० कोटी रुपयांचा फरक आहे. त्यामुळे काही नवीन प्रश्न पडले आहेत, ज्याची उत्तरे मुंबई महानगरपालिकेने द्यायला हवीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT