Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही अन्...; EVMच्या मुद्द्यावरून मंत्री विखे पाटील यांची टीका

Radha Krishna Vikhe Patil News: उद्धव ठाकरे यांनी EVMवर शंका उपस्थित करत सरकारला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं आहे. यावरून मंत्री महसूलंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरेंवर टीका केली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

सचिन बनसोडे, अहमदनगर

Radha Krishna Vikhe Patil on Uddhav Thackeray:

देशात काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. मात्र, भाजपच्या तीन राज्याील यशावर विरोधी पक्षातील नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी EVMवर शंका उपस्थित करत सरकारला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं आहे. यावरून मंत्री महसूलंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगरच्या कोपरगावात विविध विकासकामांचे उद्घाटन झालं. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी EVM-बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Milk Price Issue: दूधदरासाठी पुण्यात रयत क्रांतीचा माेर्चा, संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकली किसान सभा

विखे पाटील यांची ठाकरेंवर टीका

'सर्व राजकीय पक्षाकडून विधाने सुरू आहेत, ती बौद्धिक दिवाळखोरी आहे. तेलंगणाच्या बाबतीत काही शंका आहे का? ज्यांना जनाधार राहिला नाही . आपला पक्ष सांभाळता आला नाही. आमदार सोडून गेलेत. त्यांनी EVM , बॅलेट बाबत बोलणे म्हणजे त्यांची किव येत आहे', अशी टीका विखे पाटील यांनी केली.

Maharashtra Politics
Manoj Jarange Patil: '२४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण दिलं नाही तर...' जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; भुजबळांवरही साधला निशाणा

इंडिया आघाडी सत्तेसाठी हपापलेली : विखे पाटील यांची टीका

इंडिया आघाडीतील नेत्यांच्या नाराजीवरही विखे पाटील यांनी भाष्य केलं. 'खरंतर आघाडीत आधीपासूनच बिघाडी आहे. स्वार्थी लोक एकत्र आले आहेत. ते देशाच्या हितासाठी एकत्र आलेले नाहीत. इंडिया आघाडीने कोणता अजेंडा देशासाठी मांडला ? जगातील नेते मोदींच नेतृत्व मान्य करत आहेत. आज आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. इंडिया आघाडी सत्तेसाठी हपापलेली आहे, अशी टीका विखे पाटील यांनी इंडिया आघाडीवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com