Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray News : शिंदे गटाचा उद्या जागतिक 'खोके दिन'; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा

Political news सरकार पडल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवेत हे लोकांचा म्हणणं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचं राज्यव्यापी पदाधिकारी शिबीर आज मुंबईत पार पडत आहे. या शिबीरात कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, आज जागतिक फादर डे आहे. काहीजण दुसऱ्यांच्या वडिलांना चोरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या फोटोचा वापर करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. (Political News)

जाहिरातीचा धसका

उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. मात्र काही लोकांना एका जाहिरातीचा इतका धसका घेतला आहे की उद्याचा वर्धापन दिन आणि आजच ट्वीट करून शुभेच्छा दिल्या. कदाचित दिल्लीवरून सांगितलं असेल आजच ट्वीट करा, असा टोला आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

आंतरराष्ट्रीय खोके दिन

20 जून रोजी महत्वाचा दिवस आहे. परवा आंतरराष्ट्रीय खोके दिन आहे. कारण या घटनेची 30 पेक्षा जास्त देशांना दखल घेतली आहे. सरकार पडल्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हवेत हे लोकांचा म्हणणं आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

एकनाथ शिंदेना आव्हान

परदेशात सुद्धा लोक विचारत होते तुमचं सरकार कधी येणार? त्यांना सुद्धा सरकार आपलं हवं आहे. प्रत्येकाला आपलं सरकार हव आहे. मी प्रेझेन्टेशन देतोय, जे आम्ही मुंबईत काम केलं. असंच प्रेझेन्टेशन शिंदे गटाने द्यावे की त्यांनी मुंबईत काय काम केलं? असं आव्हान आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेना दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT