Aditya Birla Group Saam Tv
मुंबई/पुणे

अबब! दक्षिण मुंबईतील आलिशान बंगला 'Aditya Birla' ने खरेदी केला; किंमत वाचून डोळे गरागरा फिरतील!

Latest News: हा बंगला खरेदी करण्यासाठी खरेदीदाराने 13.20 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

Priya More

Mumbai News: आदित्य बिर्ला ग्रुपची (Aditya Birla Group) कंपनी बीजीएस प्रॉपर्टीजने मुंबईतील उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या परिसरात आलिशान बंगला खरेदी केला आहे. हा बंगला 220 कोटी रुपयांना खरेदी केला असल्याची माहिती समोर आली आहे. हा सनी विले बंगला दक्षिण मुंबईतील अपस्केल कारमाइकल रोडवर अर्ध्या एकरात पसरलेला आहे. या बंगल्याचे एकूण क्षेत्रफळ 18,494.05 चौरस फूट आहे. तर गॅरेजचे एकूण क्षेत्रफळ 190 चौरस फूट आहे.

हा बंगला पारशी व्यक्तीच्या मालकीचा होता. दस्ताऐवजवरुन या बंगल्याची नोंदणी 10 एप्रिल 2023 रोजी करण्यात आली असल्याची माहिती समजते. हा बंगला खरेदी करण्यासाठी खरेदीदाराने 13.20 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. या प्रॉपर्टीचा व्यवहार ट्रान्सफर डीडद्वारे करण्यात आला आहे. ट्रान्सफरच्या डॉक्युमेंटवरुन हे समजते की, ही प्रॉपर्टी एर्नी खरशेदजी दुबाश यांच्या मालकीची होती.

2015 मध्ये कुमार मंगलम बिर्ला यांनी मलबार हिलच्या लिटिल गिब्स रोडवर असलेले जटिला हाऊस 425 कोटी रुपयांना खरेदी केले होते. हे घर दोन मंजली आहे. या घरामध्ये खूप मोठी मोकळी जागा आणि मोठा पार्किंग एरिया आहे. जटिया हाऊसचे एकूण क्षेत्रफळ 25,000 चौरस फूट आहे. हे घर होमी भाभा यांच्या घरापासून जवळ आहे. होमी भाभा यांचे घर 2014 मध्ये 372 कोटी रुपयांना विकले गेले होते.

प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना स्थिर मालमत्तेत गुंतवणूक करायला आवडते. ते सध्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत 180 व्या स्थानावर आहे. याशिवाय, फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्समध्ये त्यांची एकूण संपत्ती 14.8 अब्ज डॉलर ऐवढी आहे. कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांचे कुटुंब हे भारतातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब आहे. मंगलम बिर्ला यांना नुकताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राघव चड्ढांची आपनेच केली बोलती बंद! राज्यसभेतलं पदही काढून घेतलं; दिल्लीच्या राजकारणात खळबळ

Jay Pawar Education: जय पवारांची राजकारणात अधिकृत एन्ट्री; जाणून घ्या त्यांचं शिक्षण किती झालंय?

Coconut water sweetness: फिकट की गडद? शहाळ्याचा रंगच सांगतो पाणी गोड आहे की नाही

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड

Ravi Varma Painting: पुण्यातील उद्योगपतीनं खरेदी केली १६७ कोटींची पेटिंग, नेमकं खास काय आहे?

SCROLL FOR NEXT