Ajit Pawar: तर त्यांना कसलीच शासकीय सवलत द्यायची नाही : अजित पवार

तर त्यांना कसलीच शासकीय सवलत द्यायची नाही : अजित पवार
Ajit Pawar
Ajit PawarSaam tv

बारामती : इथून पुढे दोन पेक्षा जास्त अपत्य जन्माला घालतील. त्यांना कसलीच सवलत द्यायची नाही. त्यामुळे (Baramati) त्यांना काही सवलत नावाचा प्रकारच मिळणार नाही. ही आमची मागणी असून केंद्राने याबाबत विचार करावा; असे मत विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (Breaking Marathi News)

Ajit Pawar
Jalgaon Shiv Sena News: गुलाबरावांचा मुखडा घालून समर्थक सभेला रवाना; गुलाबराव बाहुबलीच्‍या रूपात

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती येथे आहेत. येथे आयोजित एका खाजगी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार बोलत होते. पवार म्‍हणाले, की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही दोन पेक्षा जास्त अपत्‍य असेल त्यांना ग्रामपंचायत, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना उभे राहता येणार नाही; असा निर्णय घेतला होता. तसेच त्यांना सहकारामध्ये उभे राहण्यासाठी अपात्र केले. त्यावेळेस आमदारकी व खासदारकीला अपात्र करत आहेत, असे काहीजण म्‍हणत होते. मात्र ही गोष्ट आमच्या हातात नसून ही केंद्राच्या हातात आहे. यामुळे केंद्राने ही गोष्ट करावी, ही आमची देखील मागणी आहे.

Ajit Pawar
Accident News: सायकलस्‍वारास बसची धडक; शेतमजूराचा मृत्‍यू

कोणत्याही प्रकारे सवलती नाही दिल्या, तर जनता जागृत होईल. त्यामुळे ज्यांना निवडणूक लढवायची असेल ते बरोबर दोन अपत्त्यावर थांबतात. यामध्ये देखील आम्ही मार्ग काढला. पहिली डिलिव्हरीला मुलगा झाला आणि दुसऱ्या डिलिव्हरीला जुळ झालं. यात आई बापाचा दोष नाही. मात्र तीन– तीन झाली. मग दुसऱ्या कॅबिनेटमध्ये मांडलं जर तीळ झालं तर यामध्ये त्यांचा दोष नाही. यामध्ये पहिलं जर जुळं झालं तर तिथेच थांबायचं आणि पहिलं तिळ झाला तरी तिथंच थांबायच हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय; असे परखड मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com