Mumbai Iron Bridge Stealing  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Iron Bridge Stealing : आँंsss...काय सांगता! मुंबईत चक्क ९० फूट लांब, ६००० किलो वजनाचा लोखंडी पूल गेला चोरीला

Mumbai Malad Crime News: आँंsss...काय सांगता! मुंबईत चक्क ९० फूट लांब, ६००० किलो वजनाचा लोखंडी पूल गेला चोरीला

Satish Kengar

Mumbai Malad Crime News: आतापर्यंत तुम्ही कार, स्कूटर, घरातील दागिने, इतकंच काय तर विहीर चोरी झाली, असंही ऐकलं असेल. मात्र तुम्ही कधी भलामोठा लोखंडी पूल चोरी झाल्याचं ऐकलं आहे का? नाही ना, मात्र मुंबईत अशी एक घटना घडली आहे. येथे पश्चिम उपनगरातील नाल्यावरील ६००० किलोचा लोखंडी पूल चोरल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत बांगूर नगर पोलिस स्टेशनच्या एका पोलिस अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितलं की, मालाड (पश्चिम) येथे ९० फूट लांबीच्या लोखंडी पुलाचे स्ट्रक्चर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या युटिलिटी कंपनीने इलेक्ट्रिक पॉवर केबल्स एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची ठेवले होते.

त्यांनी सांगितलं की, येथील नाल्यावर कायमस्वरूपी पूल बांधल्यानंतर येथे तात्पुरती स्वरूपात ठेवण्यात आलेला लोखंडी पूल अन्य ठिकाणी हलविण्यात आला होता. २६ जून रोजी हा पूल बेपत्ता असल्याचे आढळून आल्याने वीज कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)

ज्या कंपनीला पूल बांधण्याचे कंत्राट दिले, तेथील कर्मचाऱ्यांवरच चोरीचा आरोप

तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, पुलला शेवटचे ६ जून रोजी पाहिले गेले होते. घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या भागात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. यात ११ जून रोजी एक मोठे वाहन पुलाच्या दिशेने जाताना आढळले, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

यानंतर पोलिसांनी वाहनाचा नोंदणी क्रमांकावरून शोध घेतला. पोलिसांनी सांगितलं की, "वाहनात गॅस कटिंग मशीन होती, ज्याचा उपयोग पूल पाडण्यासाठी आणि ६,००० किलो वजनाचे लोखंड चोरण्यासाठी करण्यात आले होते.''

अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी पुलाच्या बांधकामाचे कंत्राट दिलेल्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचा शोध घेतला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी गेल्या आठवड्यात कर्मचारी आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली होती. घटनास्थळावरून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayavati News : तर बसप सरकारमध्ये सामील; महासभेतून सुश्री मायावतींचे संकेत

Shrigonda Vidhan Sabha : राहुल जगताप यांचे पक्षातून निलंबन; बंडखोरी केल्याने शरद पवार गटाची कारवाई

Vande Bharat food : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये देण्यात आलेल्या सांबारात किडे तरंगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, या ठिकाणी घडली घटना

Solapur Politics : सोलापुरात शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

GK: भारताव्यतिरिक्त 'या' देशांमध्येही रुपया चालतो, प्रवास करण्याआधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT