Raj Nayani on Chitra Wagh Saam TV
मुंबई/पुणे

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

Raj Nayani on Chitra Wagh: चित्रा वाघ यांनी माफी मागावी, अन्यथा, अब्रुनुकसानी दावा दाखल करणार ” असा इशारा अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी दिला आहे.

Satish Daud

Raj Nayani on Chitra Wagh

“मी एक चारित्र्यवान कलावंत असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पॉर्न स्टारची उपमा देऊन माझा अपमान केला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत त्यांनी माझी माफी मागावी. अन्यथा, अब्रुनुकसानी दावा दाखल करणार ” असा इशारा अभिनेते प्याराली उर्फ राज नयानी यांनी दिला आहे.

"भाजपच्या नेत्या चित्रा वाघ एक सुशिक्षित महिला आहेत. कलावंत जेव्हा एखाद्या सिनेमांत किंवा मालिकेत काम करतो, तेव्हा त्याला त्या भूमिकेची जशी मागणी असते. त्याप्रमाणे अभिनय करावा लागतो. हे त्यांना माहीत असावे", असंही राज नयानी यांनी म्हटलं आहे.

"चित्रा वाघ यांनी एका वेब सीरिज मधील माझा फोटो दाखवून मी पॉर्न स्टार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याची मी निंदा करतो, असं राज नयानी म्हणाले. त्यांनी प्रेस कॉन्फरेन्समध्ये जे फोटो दाखवले. ते एका वेबसीरिज मधील आहेत. माझ्या अभिनयातील भूमिकेचा तो एक भाग होता", असंही नयानी यांनी म्हटलंय.

"शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीत मी काम केले आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांनी राजकीय सूडबुद्धीने माझा उल्लेख पॉर्न स्टार म्हणून केला आहे. त्यांनी दोन दिवसात माझी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर मी अब्रूनुकसान केल्याचा दावा कोर्टात दाखल करेन", असा इशाराही राज नयानी यांनी दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी जाहीर पत्रकारपरिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव सेनेने पॉर्न स्टारला घेऊन जाहिरात बनविल्या, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

उद्धव सेनेची निवडणूक प्रचाराची जाहिरात बनवणारी कंपनी, ठाकरे परिवार तसेच, जाहिरातीमध्ये पित्याची भूमिका वठविणारा पॉर्न स्टार आणि उद्धवसेना यांचा संबंध काय आहे, असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.

ही जाहिरात पाहून स्त्री, पत्नी, आई आणि मुलगी म्हणून माझी मान शरमेने खाली झुकली गेली. हा पॉर्नस्टार महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असा प्रश्न विचारतो, यासारखी महिलांची क्रूर चेष्टा नाही, असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT