Maharashtra Politics: जाहिरातीतील पॉर्नस्टारवरून भाजप अन् ठाकरे गटात जुंपली; चित्रा वाघ यांच्या आरोपांना उत्तर

Chitra Wagh : उबाठा पक्षाकडून महिला अत्याचारासंदर्भात एक जाहिरात केली जातेय. या जाहिरातीवरून चित्रा वाघ यांनी शिवसेना उबाठा आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. महिला अत्याचारासंदर्भात केलेल्या जाणाऱ्या जाहिरातीमधील कलाकार पॉर्न स्टार असल्याचं त्या म्हणाल्या.
 Chitra Wagh  Vs Aditya Thackeray :
Chitra Wagh Vs Aditya Thackeray :

Chitra Wagh Vs Aditya Thackeray :

ठाकरे गट आणि भाजपमध्ये एका पॉनस्टारवरून वाद पेटलाय. ठाकरे गट पॉर्नस्टार जाहिरात करत प्रचार करत असल्याचा आरोप भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. त्याला ठाकरे गटाकडून जोरदार उत्तर दिलं जात आहे. आदित्य ठाकरेंनी चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावलेत. फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही चित्रा वाघ यांच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतलाय.

शिवसेना उबाठा पक्षाकडून महिला अत्याचारासंदर्भात एक जाहिरात केली जातेय. या जाहिरातीवरून चित्रा वाघ यांनी शिवसेना उबाठा आणि आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. महिला अत्याचारासंदर्भात केलेल्या जाणाऱ्या जाहिरातीमधील कलाकार पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केलंय. त्यात तो महिलांचे शोषण करतो. मग, अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी करता, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला होता.

त्याला आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. भाजपने आता प्रज्वल रेवण्णावर बोलावं. भाजपच्या भारतातील सर्वोच्च नेत्याने येऊन त्याचा प्रचार केला. अशा राक्षसी माणूस भारतात आला तरी भाजपमधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी चित्रा वाघ यांना लगावलाय.

भाजपच्या आक्रस्ताळेबाईंनी घाईघाईत दिशाभूल करणारी माहिती दिली. कलाकार वेगवेगळ्या भुमिका करतो. कलाकाराच्या भुमिकेवरच त्या बोलणार असतील तर, नवनीत राणा आणि कंगणा राणावतच्या भुमिकांवर त्या काय बोलणार. त्यांचीही अत्यंत वाईट दृष्य आहेत. ⁠प्रज्वल्ल रेवण्णाचे तीन हजार पेक्षा जास्त व्हिडिओ बाहेर आलेत. त्यावर त्या काय बोलणार आहेत? असा सवाल करत सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांचा समाचार घेतला.

⁠चित्रा वाघ यांनी घाईघाईने व्यक्त होण्याआधी पक्षाचा सल्ला घ्यावा. ⁠मनोज तिवारींच्या काही भुमिका त्यांनी पहाव्यात. ते दोन टर्म भाजपचे खासदार आहेत. भाजपच्या हातातून निवडणूक निघून चाललीय. ⁠आज दोन तारीख आहे. कदाचित पगार घेण्यासाठी आक्रास्तळ्या बाईंनी आजचे अपूर्ण माहीतीच्या आधारे आरोप केले असावेत, असा टोला सुषमा अंधारेंनी त्यांना लगावलाय.

प्रज्वल रेवण्णावरून चुतर्वेदींचा भाजपला टोला

जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचं शोषण केलं. घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही याबाबत का विचारत नाहीत. मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबातीत का विधान केलं नाही. २५०० पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप समोर आलेत. तोच व्यक्ती भाजपासोबत येऊन लोकसभेची लढाई लढत आहे. त्याला पळवून लावण्याचं काम तुम्ही केलं. तो फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. जरा तरी लाज वाटू द्या, पाण्यात बुडून मरा, अशा शब्दात प्रियंका चतुर्वेदी यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावलाय.

 Chitra Wagh  Vs Aditya Thackeray :
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचा केजरीवाल होईल; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com