सागर आव्हाड
पुणे - हवेली तालुक्यातील Haveli Tehsildar कोंढवा येवलेवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध हवेली महसूल पथकाने धडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आज वाळूने भरलेली ७ आणि रिकामे १ वाहन ताब्यात घेतले आहे. तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील Trupati Kolte Patil यांनी भल्या पहाटे ही कारवाई केल्याने वाळूतस्करांचे sand smugglers धाबे चांगलेच दणाणले आहेत. Action taken by Haveli Tehsildar on sand smugglers
हे देखील पहा -
पहाटे सकाळी ६ वाजता हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील, खेड शिवापूर मंडळाधिकारी सूर्यकांत पाटील, विकास फुके, सुर्यकांत काळे, आरती खरे, कल्याणी कुडाळ, प्रविण घुले, पांडूरंग चव्हाण आदींच्या भरारी कोंढव्यातील इस्कॉन मंदिरानजीक चार अनाधिकृत वाळू वाहतूक करणारे ट्रक पकडले. तर येवलेवाडी येथून वाळू घेण्याकरिता आलेले तीन मातीमिश्रित वाळूचे ट्रक पकडण्यात आले आहेत.
कोंढवा-येवलेवाडी परिसरात रात्री-अपरात्री हायवा, ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक होत असून संबंधित वाळूतस्करांवर कारवाई झाल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईत एकूण ७ वाहनांमधील अंदाजे २५ ते ३० ब्रास मातीमिश्रीत वाळू ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेले वाळूचे ट्रक हे आंबेगाव मधील शिवसृष्टी जवळ असणाऱ्या रिकाम्या जागेत लावण्यात आले आहेत.Action taken by Haveli Tehsildar on sand smugglers
कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कारवाई केल्यास चालक गाडी जागेवर सोडून फरार होतात किंवा गाडीची वायरिंग कट करणे, फ्यूज काढून घेणे, गाडीत बिघाड करुन ठेवणे अशा गोष्टी करतात. त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने गाडी दुसऱ्या जागी घेऊन जावी लागते. गाडी ताब्यात घेतल्यास प्रशासनाकडे गाड्या लावण्यासाठी जागा नसल्याने गाड्या कुठे लावायचा हा प्रश्न आता निर्माण होत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.