डॉ. माधव सावरगावे
औरंगाबाद - वाळूज परिसरामध्ये आज पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. सात जन्म काय सात सेकंद देखील आम्हाला बायको नको,असा घोषणा देत पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८ प्रदक्षिणा घालत या पुरुषांनी पूजन केले. Wife victim men celebrate Pimpal Pournima
उद्या वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वटपौर्णिमेचे पूजा करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात, जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. मात्र, वटपौर्णिमेच्या पहिल्या दिवशी पत्नी पीडित संघटनेच्या सदस्यांनी आणि पत्नी पीडित पतींनी पिंपळ पौर्णिमा साजरी करून ती पत्नी कधीच नको अशी प्रार्थना केली.
औरंगाबाद शहरात २०१७ पासून पत्नी पीडित संघटना ही राज्यभरातील पत्नी पीडित पतीसाठी काम करीत आहे. यासाठी वाळूज परिसरात पत्नी पीडितांच्या निवासासाठी पत्नी पीडित आश्रम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी राज्यभरातून आतापर्यंत जवळपास ९ हजार पत्नी पीडितांनी नोंदणी केली आहे. बायकोपासून सुटका व्हावी म्हणून अनेक पीडित न्यायालयीन लढा देत आहे. मात्र या पुरुषांना न्याय मिळत नसून प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागत आहे. त्यासाठी पत्नी पीडित आश्रमाच्या माध्यमातून या पुरुषांना मदत केली जात आहे. घरातून हाकलून दिलेले पुरुष या ठिकाणी राहतात. Wife victim men celebrate Pimpal Pournima
वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाचे पूजन करून कुटुंबाच्या आणि पतीच्या आरोग्यासाठी देवाकडे साकडे घालतात. मात्र, हे जर खरे असेल तर वडाच्या ऐवजी पिंपळाची पूजा करून बायको पासून सुटका मिळावी म्हणून विनवणी करण्यासाठी हे पूजन करण्यात आले. पिंपळ हे लग्न न झालेल्या व्यक्तीचे प्रतिक मानले जाते. मग आम्ही पिंपळाची १०८ उलट्या प्रदक्षिणा घालून पूजा करून बायको पासून सुटका व्हावी अशी विनवणी करतो, असे पत्नी पीडित पुरुषांनी सांगितले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.