Baba Siddique Death Case Police Press Conference Saam Tv
मुंबई/पुणे

Baba Siddique Death : मिरचीचा स्प्रे मारून करणार होते गोळीबार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांनी काय सांगितलं?

Baba Siddique Death Case Police Press Conference : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली. आरोपींची कसा बाबा सिद्धीकी यांच्या हत्याच कट कसा रचला होता, याची माहिती दिली आहे.

Satish Kengar

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलिसांनी या घटनेशी संबंधित महत्वाची माहिती दिली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून हत्या करण्याचा आरोपींचा डाव होता. धर्मराज राजेश कश्यप याने स्प्रे आणला होता. मात्र त्याआधीच आरोपी शिव कुमार गौतम उर्फ शिवा याने गोळीबार केला. त्यानंतर गोळीबार करताना धावपळीत स्प्रे पडल्याची माहिती आरोपींची पोलिसांना दिली. मुंबई पोलिसांनी रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या अँगलनेही या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काल रात्री 9 ते 9.30 च्या दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपस तत्काळ मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. मुंबई पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना घटनास्थळी अटक केली.

आरोपींकडून काय जप्त करण्यात आलं याबाबत पोलिसांनी सांगितले की, दोन पिस्तूल आणि २८ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीची भूमिका काय होती, याचा तपास करत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं.

बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेबाबत दत्ता नलावडे यांनी सांगितले की, "त्यांना अवर्गीकृत सुरक्षा मिळाली होती. त्याच्या सुरक्षेसाठी तीन पोलीस कर्मचारी देण्यात आले होते. गुन्हे शाखेची १५ पथके याप्रकरणी तपास करत आहेत. प्रत्येक अँगलने तपास केला जात आहे. जिथे बाहेरील पोलिसांची मदत हवी असेल तिथे त्यांची मदत घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT