'मोक्का' कारवाई नंतरही आरोपी गायकवाड पिता-पुत्र फरार! सागर आव्हाड
मुंबई/पुणे

'मोक्का' कारवाई नंतरही आरोपी गायकवाड पिता-पुत्र फरार!

गणेश नानासाहेब गायकवाड व वडील नानासाहेब गायकवाडसह पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र मोक्का कारवाई नंतरही आरोपी गायकवाड पिता-पुत्र फरार आहेत.

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे : पुण्यात पैश्याच्या जोरावर गुन्हे करणा-या कॉंग्रेस नेत्यासह आठ जणांना मोक्का ठोठावण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, खंडणी, पठाणी सावकारी, जागा बळकावणे अशा विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या केदार ऊर्फ गणेश नानासाहेब गायकवाड व त्याचे वडील उद्योजक नानासाहेब गायकवाडसह पाच जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र मोक्का कारवाई दरम्यान त्यांचे अनेक राजकीय संबंध तसेच आध्यात्मिक गुरुंचे सबंध उघड झाले आहेत.Accused Gaikwad father-son absconding even after 'Mocca' action

गणेश गायकवाडांचे अनेक मोठ्या राजकीय आणि अध्यात्मिक गुरुंशी असलेले संबंध आता समोर येत आहेत. दरम्यान गायकवाडांवर गुन्हा दाखल होण्याच्या काही दिवस आधी मोरे गुरुजींनी गायकवाडच्या घरी पाहुणचार घेतला आहे. गुरुजींचं हेलीकॅाप्टर मधून झालेलं स्वागत आणि गायकवाड यांनी केलेला पाहुणचार पुण्यात चर्चेचा विषय ठरला होता.

राजकीय सबंध

कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही गायकवाड यांच्या घरी हजेरी लावली होती. तेंव्हा गणेश गायकवाडचा कॉग्रेस पक्षात प्रवेश पटोलेंनी करुण घेतला होता. गायकवाड टोळीच्या अशा संबधांनुळेच आतापंर्यत त्यांच्या विरोधात तक्रार करायला कोणी धजावत नव्हते. मात्र मोक्का कारवाईनंतर हे सर्व समोर आलंय

नानासाहेब गायकवाड व त्याचा मुलगा गणेश गायकवाड याच्या कृत्याने उद्योगजगत व राजकारणात खळबळ माजवली आहे. अफाट पैसा व इस्टेट कमावून देखील मुलाला आमदार करण्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे अनेक दृष्कृत्ये तसेच क्रुरकहाण्या जगासमोर येउ लागल्या आहेत राजकीय गुरू रघुनाथ येमुलच्या सांगण्यावरून सुनेचा आतोनात छळ करण्यात आला पुणे पोलिसांकडे 5 गुन्हे दाखल आहेत गणेश गाईकवडचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आला आहे असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता सांगतात.

गायकवाड विरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात 9 कोटी रुपयांची जमीन बळकावनूक केल्याचा गुन्हा जून महिन्यातच नोंदविण्यात आला आहे.पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची सूस येथील 1 एकर जागा गायकवाडांनी बळकावून त्यांची फसवणूक केली आहे. तसेच 20 लाख रुपयाच्या मुद्दलेबदल्यात 85 लाख रुपये व्याज्याच्या पैशापायी रायगड येथील 7 एकर जागा आणि पुण्यातील 4 गुंठे जागा बळजबरिने जमीन बळकावली असून आम्ही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे .आमचे सारखे असे अनेक लोक आहेत त्यांना गायकवाड ने त्रास दिला आहे .दरोडा, खंडणी, गोळीबार, अपहरणासह अवैध सावकारी व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून देखील गायकवाड पितापुत्र अद्याप मोकाट फिरत आहेत अशी माहिती गायकवाड विरोधातील तक्रारदाराने दिली आहे.

गायकवाड पितापुत्र व साथीदारांवर एवढे गुन्हे दाखल होत आहेत. पिंपरी-चिंचवड सह पुण्यातही चतुशृंगी पोलिस ठाणे अनेक गुन्हे दाखल होऊनही गणेश व त्याचे वडील नानासाहेब यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याचे दिसून येत आहे. चतुशृंगीं येथे दोन गुन्ह्यांसह पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल तिन्ही गुन्ह्यातही आरोपींना दीड महिन्यानंतरही अटक झालेली नाही. अजून किती गंभीर गुन्हे केल्यानंतर पोलीस प्रशासन गायकवाड पितापुत्राला अटक करणार आहेत? असा प्रश्न पुणेकरांना पडलेला आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Air Pollution : वायू प्रदुषणामुळे पाकिस्तानात आणीबाणी, तब्बल 20 लाख लोकांची प्रकृती बिघडली, लाहोरमधला आकडा धक्कादायक

Screenshot ला मराठीत काय म्हणतात? ९९ टक्के लोकांना माहिती नसेल उत्तर

KVP Yojana: खुशखबर! या योजनेत गुंतवलेले पैसे होणार डबल, गुंतवणूदारांना फायदाच फायदा; योजनेचा लाभ कसा घ्यायचा?

VIDEO : मोदींना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल | Marathi News

Mumbai Local Mega Block: प्रवाशांनो कृपया लक्ष असूद्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहून पडा घराबाहेर

SCROLL FOR NEXT