Pune Bhor Accident 
मुंबई/पुणे

Pune : भोरमध्ये भीषण अपघात, ९ जणांना घेऊन जाणारी कार १०० फूट दरीत कोसळली

Pune Bhor Accident : पुण्यातील भोरमध्ये पहाटे भीषण अपघात झालाय. ९ जणांना घेऊन जाणारी इको कार १०० फूट खोल दरीत कोसळली. एका तरूणाचा मृत्यू झालाय, तर ८ जण जखमी आहेत. पोलिसांकडून बचावकार्य सूरू आहे.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

Pune bhor News : पुण्याजवळच्या वरंध घाटात भीषण अपघात झालाय. ९ जणांना घेऊन जाणारी इको कार १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर ८ जण जखमी आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतेय. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील भोर - महाड मार्गावरील वरंध घाटात पहाटे भीषण अपघात झालाय. ९ जणांना घेऊन जाणारी इको कार 100 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक जणाचा मृत्यू झालाय, तर 8 जण जखमी आहेत. जखणींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, इको कार महाडहून भोरच्या दिशेने येत होती. त्यावेळी पहाटे चार वाजता वरंध घाटातील उंबरडे गावच्या हद्दीत कार अचानक १०० फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

वरंध घाटातील अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याशिवाय बचाव पथकही तात्काळ पोहचलं. स्थानिक शिरगाव रेस्क्यू पथकाच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढलं. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

शुभम शिर्के असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश गुजर वय 26, आशिष गायकवाड वय 29, सिद्धार्थ गंधणे वय 26, सौरभ महादे वय 22, गणेश लवंडे वय 27, अमोल रेकीणरं वय 27, यशराज चंद्र वय 22, आकाश आडकर वय 25 हे जखमी झाल्याल्यांची नावं आहेत. भोर पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT