Mumbai Local Video Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: एसी लोकलमधून मध्य रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्यांचा प्रवास, टीसीला जाब विचारला; प्रवाशांचा संताप| VIDEO

Mumbai Local Video: एसी लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. टीसी इतर प्रवाशांचे तिकीट तपासत होते पण त्यांनी या रेल्वे कर्मचाऱ्यांचे तिकीट तपासले नाही त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला.

Priya More

मयुरेश कडव, मुंबई

मध्य रेल्वेच्या एसी लोकल आणि फर्स्ट क्लास डब्यामधून फुकट्या रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. NRMUचं कार्ड खिशात ठेवून रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरू आहे. संतापजनक बाब म्हणजे प्रवाशांनी तक्रार करूनही रेल्वेचे टीसी त्याकडे सपशेल कानाडोळा करतात. याचाच भांडाफोड साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी केला आहे.

आज संध्याकाळी ५.१२ च्या एसी लोकलने साम टीव्हीचे प्रतिनिधी दादरहून अंबरनाथकडे प्रवास करत होते. त्यावेळी तिकीट चेकिंगसाठी ४ टीसी लोकलमध्ये आले. आमच्या प्रतिनिधींनी आणि सहप्रवाशांनी टीसींना आपलं तिकीट दाखवलं. मात्र सीटवर बसून आरामात प्रवास करणाऱ्या इतर चार ते पाच प्रवाशांनी स्टाफ सांगताच तिथे उपस्थित असलेल्या टीसीने यांच्या जवळील तिकीट किंवा पास तपासण्याची तसदीही दाखवली नाही. त्या प्रवाशांपैकी एक प्रवासी खिशामध्ये NRMUCचं कार्ड ठेवून प्रवास करत होता.

या प्रवाशांचे तिकीट किंवा पास का तपासले नाहीत? याचा जाब आमच्या प्रतिनिधींनी टीसींना विचारला. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं तर इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आम्ही यांच्या सांगण्यावरून आमचा पास का दाखवायचा का? असा उलट सवालही विचारला. अखेर आमच्या प्रतिनिधीनं या सगळ्या घटनेचं रेकॉर्डिंग सुरू केल्यानंतर टीसींनी रेल्वे कर्मचाऱ्यांचं तिकीट तपासायला सुरुवात केली. मात्र तो रेल्वे कर्मचारी NRMUचं कार्ड खिशात ठेवून प्रवास करत होता. त्याच्यावर मागणी करूनही टीसींनी तिथल्या तिथेच दंडात्मक कारवाई केलीच नाही.

या घटनेतून रेल्वे कर्मचारी आणि रेल्वेच्या टीसींची मग्रुरी पुन्हा एकदा समोर आली आहे. एकीकडे सर्वसामान्य प्रवाशांनी एखादा नियम तोडला तर त्यांच्यावर लगेच कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र पात्र नसलेले रेल्वे कर्मचारी आयकार्डच्या जीवावर बिनधास्तपणे फर्स्ट क्लास आणि एसी लोकल डब्यातून प्रवास करत असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे मध्य रेल्वेचे डीआरएम या प्रकरणाची दखल घेऊन प्रवाशांशी उद्धटपणे वागणारे टीसी आणि अवैधपणे फर्स्ट क्लास तसच एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Heart Attack: तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय? काय आहेत कारणे?

Maharashtra Live News Update: सरकार चालढकल करतेय; माणिकराव ठाकरे यांचा आरोप

Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

SCROLL FOR NEXT