Shrikant Shinde on Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Shrikant Shinde: आदित्य ठाकरे कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा, श्रीकांत शिंदे यांनी थेट आव्हानच दिलं

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Shrikant Shinde on Aditya Thackeray:

आदित्य ठाकरे कल्याण लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. यातच खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत आज पुन्हा आदित्य ठाकरे यांना आवाहन केलं. आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करताना त्यांनी स्वप्न पाहण्यात गैर नाही. ज्याला पण इथून उभे राहायचे त्यांनी राहावे, स्पर्धा ही झाली पाहिजे. त्यासाठी विरोधक पण चांगला असावा. तरच लढाईला मजा येईल, ज्याला या ठिकाणी उभे राहायचे आहे त्यांनी आधी ठरवावे ते वरळीतून उभे राहणार ठाण्यातून की कल्याण मधून, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

रोज वक्तव्य करायची राजकारणात अशा गोष्टी होत असतात. आपल्याला काही करायचे होते तर अडीच वर्षे आपल्याकडे सत्ता होती, तेव्हा करायला हवे होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरला सेशन चालवतात, पण पहाटे ६ वाजता येऊन मुंबईची अनेक वर्षात न झालेली साफसफाई करत आहेत. डिप क्लीन असे नाव त्याला दिले आहे. मुंबईत खूप गाळ साचला होता. त्याला साफ करण्याची गरज होती. ती साफ करण्याचे काम मुख्यमंत्री प्रत्येक आठवड्याला करत आहेत, असा उपरोधिक टोला उद्धव ठाकरे यांना लगावला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढे बोलताना येणाऱ्या काळात मुंबईची सगळी जनता साफसफाईत जोरात सामील होईल आणि मुंबई एकदम क्लीन चकाचक होईल. या मुंबईत फक्त विकासाचे राजकारण आणि पायाभूत सुविधांची कामे होतील. लोकांना जे हवे आहे ते या मुंबईत उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

वर्ल्ड क्लास पायाभूत सुविधासह चांगले रस्ते मेट्रो फ्लाय ओव्हर हेच उद्दिष्ट: श्रीकांत शिंदे

मनसे राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधीबद्दल सर्वसामान्यांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये रोष, त्यांना बदल हवा आहे, असं वक्तव्य करत अप्रत्यक्ष रित्या श्रीकांत शिंदे यांचययावर निशाणा साधला होता. यावर भाष्य करताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी माणूस जितकी कामे करतो तितकीच त्याच्यावर टीका होत असते, म्हणूनच आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही. तर दिवसरात्र लोकांची कामे करतो, असं म्हणाले आहेत.

कल्याण डोंबिवलीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हर उभारणे हे आपले ध्येय असून कोणती कामे केलीत कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत, हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो. मात्र विरोधकांची तितकी हिमत नाही. कारण त्यांच्याकडे छातीठोक पणे सांगण्यासारखी कामेच नाहीत. विरोधकांकडे टीका करण्या शिवाय काही दुसरे काम नाही, असंही ते म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले; शंभरहून अधिक मेंढ्या ठार

Marathi News Live Updates : 'भारत हे हिंदू राष्ट्र..' सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

Sanjay Raut: 'कितीही फिरले, थापा मारल्या तरी आमचेच सरकार येणार..', संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

VIDEO : जुन्नरचे पदाधिकारी पवारांच्या भेटीला; बघा काय केली मागणी

Bigg Boss 18 : सदावर्ते सलमानसोबत तू तू मैं मैं करणार, चक्क गाढवासोबत बिग बॉसच्या घरात दाखल

SCROLL FOR NEXT