aaditya thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray: एकही झाड तुटणार नाही, आरे कॉलनी रस्ता भूमिपूजन कार्यक्रमात पर्यावरण मंत्र्यांचं आश्वासन

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उद्घाटनाचा धडाका लावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उद्घाटनाचा धडाका लावला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मागील काही दिवसांपासून मुंबईत विविध कामांचे लोकापर्ण करत आहेत. आज देखील त्याच्या हस्ते मुंबई उपनगरात विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकापर्ण होत आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीसाठी स्वतः उद्धव पुत्र मैदानात उतरल्याचे पहायला मिळत आहे. आज आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनी रस्ता भूमिपूजन कार्यक्रमाला भेट दिली (Aaditya Thackeray Ensure that no tree will be cut down during Aarey Colony road construction).

"हे सरकार आपले आहे. मुख्यमंत्री आपले आहेत. आता मागण्या हक्काने पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आरेतील हा रस्ता केला पाहिजे अशी आपण चर्चा केली होती. आरेचा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे तो चांगला झाला पाहिजे. मी त्यावेळी चहल यांना फोन केला होता. रस्त्याची रुंदी न वाढवता जसा आहे तसा रस्ता राहील एकही झाड तुटणार नाही. वन्य प्राण्यांसाठी रस्त्याच्या खालून कलवट बांधण्यात येणार आहे. हा रस्ता रात्री 1 ते सकाळी 6 इतर लोकांसाठी बंद असेल फक्त आरेतील लोकांसाठी चालू असेल", अशी माहिती आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आरे कॉलनी (Aarey Colony) रस्ता भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी दिली.

"आरे (Aarey) कारशेड वाचवले आहे. कारशेडची नवीन जागा लवकरच घोषित करू. आरे हे आपण जंगल घोषित केले आहे. निवडणूका ज्यावेळी येतात त्यावेळी जी-जी कामे केली ती छाती ठोकपणे सांगावी लागतात. हा रस्ता खूप वर्ष करण्याचा बाकी होता. इथे खूप रहदारी असते. आपण वन्य प्राण्यांसाठी कनवट बनवत आहोत. आपण वाईल्ड लाईफ आणि लोकांसाठी हा रस्ता बनवत आहोत. आदिवासी पाड्यासाठी वेगळी सिस्टीम बनवत आहोत. आज 12 ठिकाणी आम्ही जात आहोत", असंही ते म्हणाले.

देशात लोकशाही किती जिवंत आहे हा विचार सर्वांनीच करावा - आदित्य ठाकरे

"देशात लोकशाही किती जिवंत आहे हा विचार सर्वांनीच करावा लागेल. जिथे निवडणुका होतात तिथे केंद्रीय तपास यंत्रणा आणि असे प्रकार समोर येत आहेत", अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी फोन टॅपिंग प्रकरणावर दिलीये. तसेच, राज्यातले जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना लवकर राज्यात आणू, असंही ते म्हणाले.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT