Sharad Pawar: राणेंना अटक झाली तेव्हा त्यांचा राजीनामा का घेतला नाही?, पवारांकडून मलिकांची पाठराखण

एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की, त्याला दाऊदचा जोडीदार धरायचं.
Sharad Pawar
Sharad PawarSaam TV
Published On

प्राची कुलकर्णी -

मुंबई: नारायण राणेंना एक न्याय आणि नवाब मलिकांना दुसरा न्याय, हे सर्व राजकीय हेतूने होतंय, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांची पाठराखण केलीये. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की, त्याला दाऊदचा जोडीदार धरायचं. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली गेली, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. (Sharad Pawar Supports Nawab Malik And Says He Was Arrested Due To Political Purpose).

Sharad Pawar
Ukraine Crisis: "उद्घाटनं महत्वाची पण, मुलांची सोडवणूकही महत्वाची" - पवारांचा मोदींना सल्ला...

मलिकांना राजकीय हेतूने अटक - पवार

"नवाब मलिकांना (Nawab Malik) अटक केलीये. राजकीय हेतूने त्यांना अटक करण्यात आल्याचं आमचं स्पष्ट मत आहे. गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवाब मलिक हे आहेत. त्या सर्व काळात त्यांचं हे चित्र कधी दिसलं नाही. हे आताच दिसलं. तसेच, एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की, त्याला दाऊदचा जोडीदार धरायचं. कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जातेय. त्यांच्या कुटुंबीयांना यातना द्यायचा प्रयत्न केला जात आहे आणि हे जाणूनबुजून केलं जात आहे", असा आरोप शरद पवारांनी (Sharad Pawar) यावेळी केला.

राणेंना वेगळा न्याय का? - पवार

"नबाव मलिकांना का म्हणतात राजीनामा द्या, तर त्यांना अटक झाली होती. मान्य आहे, ही मागणी त्यांची (भाजप) आहे. आमचे जुणे सहकारी नारायण राणे (Narayan Rane) साहेब त्यांनाही अटक झाली होती. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला, असं माझ्या पाहाण्यात आलं नाही. नारायण राणेंना एक न्याय नवाब मलिकांना दुसरा न्याय, म्हणजेच हे सर्व राजकीय हेतूने केलेला उद्योग आहे", असं म्हणत शरद पवारांनी नवाब मलिकांचं समर्थन केलं आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com