Aaditya Thackeray and CM Eknath Shinde saam tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray : सूरतमध्ये ठाकरेंशी बोलताना शिंदेंना रडू कोसळले, म्हणाले, आता माघारी फिरलो तर...'; आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Aaditya Thackeray interview : आदित्य ठाकरे यांनी शिवसेना फूट आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय पक्षातील प्रमुखांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. या निवडणुकीदरम्यान राजकीय नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून एकमेकांवर टीका सुरु आहे. याचदरम्यान, आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी लल्लनटॉप या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी सध्याचं राजकारण आणि शिवसेना फुटीवर रोखठोक मत व्यक्त केली.

शिवसेना फुटीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'बंडखोरीची तयारी ही २०२१ सालापासूनच सुरु होती. त्या काळात उद्धव ठाकरे आजारी होते. त्यावेळी रुग्णालयात त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या माणसांवर ईडीकडून कारवाई सुरु झाली होती. त्यांच्या घरावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. आमच्या सोबत आला नाहीत, तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल. असा विचार त्यांचा मनात शिवला. त्यावेळी एक एक आमदाराला विकत घेण्यास सुरुवात झाली होती, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

'त्या काळात अनेक गोष्टी आमच्या कानावर येत होत्या. त्यांचा उद्देश आम्हाला कळला होता. त्यानंतर त्यांना उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावरही बोलावलं होतं. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं का? असेही विचारले होते. हे ऐकताच त्यांना रडू कोसळलं होतं. माझं जेलमध्ये जायचं वय नाही, त्यामुळे भाजपसोबत खोट बोलत आहे. मी तुमच्यासोबत असेन. तुमच्या कानी आलेल्या गोष्टी खऱ्या नाहीत, असं शिंदेंनी ठाकरेंना सांगितल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

'राज्यसभेच्या निवडणुकीत आमच्या उमदेवाराला पाडण्यात आलं होतं. त्यानंतर ते माझ्यासोबत अयोध्येला आले होते. त्यांचा तिथूनच पळण्याचा प्लान ठरला होता. विधानपरिषद निवडणूक झाली, त्यानंतर ते शिंदे आमदारांना घेऊन निघाले. सुरुवातीला त्यांच्यासोबत १२ आमदार होते असं वाटलं. पण काही दिवसांनी आकडा वाढला. ज्यांनी खूप खाल्लं, असे चेहरे त्यांच्यासोबत होते. या प्रकरणात आम्ही अडकणार असल्याने पाऊल उचललं आहे, असा धक्कादायक खुलासा आदित्य यांनी केला.

'एकनाथ शिंदे आणि आमच्यात काही वाद नव्हते. शिंदेंनी सूरतमधून उद्धव ठाकरेंना कॉल केला होता. त्यावेळी फोनवर रडले होते. आता मागे फिरलो तर लोक मला संपवतील. ते अनेकदा रडले आहेत. त्यांनी केलेली गोष्ट वाईट होती. मुख्यमंत्री आजारी होते. त्यांना उद्धव ठाकरेंची चिंता नव्हती. जेलमध्ये जायचं नाही तर हे सरकार आपण पाडू, असा विचार शिंदेंचा होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रुपाली चाकणकर यांनी बटेंगे तो कटेंगे वादावरून भाजपला घराचा आहेर

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

Maharashtra Election : संभाजीनगरमध्ये सोन्याची गाडी सापडली, १९ कोटींचं घबाड जप्त!

SCROLL FOR NEXT