Aaditya Thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray : वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत; निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब टाकला

Aaditya Thackeray news : निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर मोठा बॉम्ब टाकला आहे. वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला.

Vishal Gangurde

वरळी मतदारयादीत १९,३३३ मतदार गडबडीत असल्याचा आमदार आदित्य ठाकरे यांचा दावा.

निवडणूक आयोगावर भाजपसाठी काम करत असल्याची गंभीर टीका ठाकरेंनी केली

ठाकरे सेनेच्या निर्धार मेळाव्यातून हा मुद्दा मांडलाय

मुंबईत ठाकरे सेनेने निर्धार मेळाव्यातून निवडणूक आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी मतदारयादीतील गडबडीवर सविस्तर भाष्य केलं. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंनी व्होटचोरीचा मुद्दा मांडत नवा राजकीय बॉम्ब टाकला. वरळीत १९ हजार ३३३ मतदार गडबडीतले आहेत. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

ठाकरे सेनेच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी एक एक मुद्दे मांडत कथित मतदारयादीतील घोळ सांगितला. आदित्य ठाकरे म्हणाले, 'आपण प्रत्येक जणांना सांगत असतो की, यादींचं वाचन झालं पाहिजे. आतापर्यंत किती शाखेत यादींचं वाचन झालं आहे, वरळीचं उदाहरण देत आहे. तुम्ही मतचोरी पकडली, तुम्ही चूक पकडली नाही, तर बोगस सरकार डोक्यावर बसेल. आता तुम्ही ठरवायचं आहे की, तुम्ही मतचोरी पकडायची आहे की नाही. वरळीत लोकसभेत २,५२, ९७० मते होती. त्यानंतर विधानसभेत ही मते २,६३,३५२ इतके मते झाली. आपण नैसर्गिक वाढ झाली, असे समजू शकतो. चार महिन्यात वाढ झाली असावी'.

'वरळीत आतापर्यंत १६,०४३ मतांची वाढ झाली. तर ५,६६१ मते आहेत. मतदारयादीचा अभ्यास केला. वाढलेले मतदार पाहिले तर, त्यात १९,३३३ मतदारांमध्ये गडबड दिसून आली. फोटो भूरकट केले आहेत. यातील नरहरी कुलकर्णी नावाच्या व्यक्तीचा लोकसभेत मृत्यू झाला होता. विधानसभेत त्यांनी येऊन मतदान केलं. यामुळे याबाबत चौकशी देखील केली. मतदान केल्यानंतर या माणसाला यादीतून काढलं आहे. हे पहिलं उदाहरण आहे,असेही ते म्हणाले.

'निवडणुकीत तुमची जबाबदारी म्हणजे मतदारयादी आहे. आता १२०० लोकांची मतदारयादी असणार आहे. या यादीचा अभ्यास करायला लागणार आहे. आतापर्यंत अनेक तंत्रज्ञान वापरून सर्व पकडू शकलो नाही. निवडणूक आयोगाकडे एक सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर फोटोच्या चुका पकडतं. ते किती याद्यांमध्ये आहे, हे आपल्याला यादी वाचूनच कळतं. तुम्ही पोलिंग एजंट बसला. त्यावेळी तुम्ही काय पाहाल. एका फोटोमध्ये फक्त नाक दाखवलं आहे. तुम्हाला फोटो ओळखता आला पाहिजे. वरळीतील गडबड असणाऱ्या मतदारांची संख्या २२ ते २३ हजार असू शकते. हा कमीत कमी आकडा वाटतोय. अजून यादीचं वाचन सुरु आहे. फोटो नसेल तर मतदाराला कसं ओळखणार, याकडेही तु्मचं लक्ष असलं पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केलं .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

SCROLL FOR NEXT