Truck Fire Saam TV
मुंबई/पुणे

Truck Fire : सौंदर्यप्रसाधनांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

या आगीत ट्रकमधील सर्व साहित्य जळून खाक झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai Truck Fire - मुंबईच्या (Mumbai) पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. मध्यरात्री 1:30 च्या सुमारास अंधेरी गुंदवली बस स्टॉप जवळ भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकला भीषण आग (Truck Fire) लागली आहे. तब्बल एक तासांमध्ये अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळ्वण्यात यश आले. या आगीत ट्रकमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीमुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या. तब्बल एक तासांमध्ये अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळ्वण्यात यश आले.

मिळालेल्या माहितीनुसार गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉस्मेटिक सामान, चप्पल, बूट, साड्या आणि विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने भरलेली होती. ट्रक अंधेरी पूर्वेकडील गुंदवली बस स्टॉप जवळ आला असता अचानक या ट्रकने पेट घेतला. ट्रक मधील सर्व साहित्य जळून खाक झाले.

प्रसंगावधान दाखवत ट्रक चालक खाली उतरल्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र ही आग नेमकी कशी लागली यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या संदर्भात अग्निशमन दल आणि अंधेरी पोलीस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT