Nandurbar News: भीषण अपघात..पिकअपचे झाले चार तुकडे; एक जण ठार, तीन गंभीर जखमी

भीषण अपघात..पिकअपचे झाले चार तुकडे; एक जण ठार, तीन गंभीर जखमी
Accident News
Accident NewsSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा– विसरवाडी राज्य महामार्गावरील वडदा गावाजवळ रात्री गुरे घेऊन जाणारे पिकअप वाहन व भंगाराचे सामान घेऊन जाणारा टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident News) एक जण ठार, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर गाईंमध्‍ये 2 वासरूंचा मृत्‍यू झाला आहे. (Letest Marathi News)

Accident News
Nanded News : नांदेडमध्ये नेमकं चाललंय काय? आदिवासी आश्रम शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

खांडबारा विसरवाडी दरम्यान (Nandurbar News) वडदा गावाजवळ सदर भीषण अपघात झाला आहे. यात पिकअप वाहनाचे जवळपास तीन ते चार तुकडे झालेले आहे. या वाहनामध्ये गायी व वासरे पाय आणि तोंड बांधून अत्यंत क्रूर पद्धतीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. अपघात एवढा भीषण होता की पिकअप वाहन चालक जागीच ठार (Accident Death) झाला आहे. तर २ गायी देखील मृत्युमुखी पडल्या आहेत. इतर गायी गंभीर जखमी झाल्या आहे. सहचालक सलमान मोहम्मद व टेम्पोमधील चालक सुनील साळुंखे, सहचालक राजेंद्र शांतीलाल पवार (रा. चिंचपाडा दहिवेल, साक्री) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

ग्रामस्‍थ धावले मदतीला

अपघात होताच वडदा गावातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. विसरवाडी 108 रुग्णवाहिकेचे पायलट मानसिंग गावित, डॉ. प्रवीण गावित व खांडबारा ग्रामीण रुग्णालय 108 रुग्णवाहिकेचे पायलट हरीश गावित, डॉ. पंकज अहिराव यांना फोन येताच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना प्राथमिक उपचार देऊन नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.

गुरांची क्रुर पद्धतीने वाहतूक

रात्रीच्या अंधारात कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या मुक्या जनावरांना क्रुर पद्धतीने तोंड व पाय बांधून त्यांच्यावर पुन्हा भंगाराचा सामान लादून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वाहनाचा वडदा गावाजवळ आयशर टेम्पोच्या धडकेत भीषण अपघात होऊन चालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. सकाळी पशुधन पर्यवेक्षक डॉ. जी. एम. अहिरे यांनी अपघातग्रस्त गायी व वासरांना तत्काळ उपचार देऊन जीवदान दिले. उपचारादरम्यान काही वासरू ठार झाल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. पशुधन पर्यवेक्षक डॉ. अहिरे यांनी अपघातात जखमी व बेशुद्ध झालेल्या गायींना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com