Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धक्कादायक! टेम्पो चालकाने पोलिसांच्या अंगावर चढवली गाडी; पोलीस शिपाई आणि रिक्षावाला जखमी

Mumbai News Today: मुंबईच्या अंधेरी परिसरातील धक्कादायक घटना

Shivani Tichkule

संजय गडदे

Mumbai News: मुंबईच्या अंधेरी परिसरातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. शनिवारी रात्री अंधेरी पोलीस ठाण्याच्या वतीने ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईसाठी बंदोबस्त लावण्यात आला. मात्र, या बंदोबस्ताच्या वेळी ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी चढवून जीवे मारण्याचा प्रकार उजेडात आला आहे.  (Latest Marathi News)

यात कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई आणि एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जोगेश्वरी येथील ड्रामा केअर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर टेम्पो चालक फरार झाला होता मात्र अंधेरी (Andheri) पोलिसांनी त्याला पहाटे सहा वाजता अटक केली. सागर गुप्ता (29 वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास अंधेरी पोलिसांनी अंधेरी पूर्वेकडील कुर्ला अंधेरी रोड नाविक माणसा बारच्या समोर ड्रंक अँड ड्राइव्हची मोहिम हाती घेतली होती. रिक्षा, मोटारसायकल आणि कार यांना थांबवून त्यांची तपासणी सुरू होती. त्यावेळी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी (Police) एक रिक्षा थांबवली.

मात्र त्याचवेळी पाठीमागून वेगात आलेल्या टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे रिक्षाचा जागी चुराडा झाला व रिक्षा चालक आणि रिक्षाच्या पुढे उभे असलेले पोलीस शिपाई प्रफुल कुमार अशोक निकम (41 वर्षे) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी या दोघांनाही जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (Mumbai News)

जखमी झालेल्या पोलीस शिपाई प्रफुल निकम यांनी यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर टेम्पोचालक सागर गुप्ता (29 वर्ष) यांच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अपघातानंतर फरार झालेल्या टेम्पोचालकाला अंधेरी पोलिसांच्या तपास पथकाने पहाटे सहा वाजता अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli News : गडचिरोलीच्या श्वेताचा दुबईत डंका; आशियाई पॅरा गेम्समध्ये केला ऐतिहासिक पराक्रम

Kitchen Hacks : वॉशिंग मशीन नियमित साफ कशी करावी? जाणून घ्या स्मार्ट टिप्स

Maharashtra Live News Update: कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम

Neha Kakkar: 'कँडी शॉप' गाण्यातील अश्लील डान्समुळे नेहा कक्कर ट्रोल; नेटिझन्स म्हणाले, 'देशाच्या संस्कृतीला कलंकित...'

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT