Crime  SaamTvNews
मुंबई/पुणे

पुण्यात किडनीसाठी दाखवलं 15 लाखांचं आमिष, सारिका सुतार या महिलेची फसवणूक...(पहा Video)

किडनी तस्करीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे: किडनी तस्करीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अनेक वेळा किडनी तस्करीसाठी अपहरण, हत्या झाल्याचे देखील समोर आले आहे. महाराष्ट्रात किडनी तस्करीची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. आता पुण्यात (Pune) देखील अशीच किडनी तस्करी आणि फसवणुकीची (fraud) घटना समोर आली आहे. पुण्यामध्ये किडनी (Kidney) ट्रासंप्लांटसाठी किडनी काढून घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे.पुण्यामध्ये एका महिलेला किडनी प्रत्यारोपणासाठी किडनी देण्यास सांगून १५ लाख रुपयांचे आमिष (Bait) देण्यात आले होते.

पहा व्हिडिओ-

यानंतर किडनी ट्रान्सप्लांटसाठी किडनी काढून घेतल्यावर पैसे देण्यास नकार देत फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप एका महिलेने केला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार प्रसिद्ध रूबी हॉल क्लिनिकमध्ये (clinic) झाल्याचा आरोप महिलेकडून करण्यात आला आहे. एका महिलेने याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान तक्रार दाखल झाल्यावर रूबी हॉल क्लिनिकमध्ये याविषयी चौकशीची मागणी करणारे पत्र पोलिसांना आहे. एका महिलेवर २४ मार्च दिवशी किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

यानंतर २९ मार्च दिवशी किडनी दान करणाऱ्या महिलेने आपली फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान कोरेगाव पार्क पोलिसांनी देखील महिलेच्या तक्रार अर्जाची दखल घेत चौकशी केली आहे. चौकशी अंतर्गत रूबी हॉल क्लिनिकमध्ये हा प्रकार घडल्याचे प्रथम तपासात निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, रूबी हॉल क्लिनिकमध्ये किडनी रॅकेटचा तपास करण्यासाठी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. किडनी दान करणाऱ्या तक्रारदार महिलेने आपण किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाची नातेवाईक नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे . तसेच आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. यानंतर हा गुन्हा उघडकीस आला. अवयव प्रत्यारोपणासाठीच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच प्रत्यारोपण केले आहे, असे रुग्णालयाचे सांगणे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IT कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मॅनेजर आणि HR अश्विनी चेनानीला कोर्टात आणलं

वॉशरूमबाहेर तरुणीसोबत नको ते कृत्य, मदत करण्याऐवजी पळून जाण्यासाठी मॅनेजरची आरोपीला मदत; नंतर... पुण्यात काय घडलं?

Accident : आंबेडकर जयंतीनंतर घरी जाताना काळाचा घाला, बाप-लेकीचा मृत्यू

Limbu Pani Recipe: उन्हामुळे घामाघूम झालात? अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार लिंबू पाणी , फ्रेश वाटेल

Rayate Accident : कल्याण-नगर मार्गावरील रायते पुलावरील अपघाताचं कारण आलं समोर, आरटीओ अहवालातून स्पष्ट

SCROLL FOR NEXT