तीन सत्रानंतर शेअर बाजारात तेजीला लगाम; सेन्सेक्स ६० हजारांच्या खाली

भारतीय शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या तेजी आता लगाम लागला
Share Market Latest News Updates
Share Market Latest News UpdatesSaam Tv
Published On

भारतीय शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या तेजी आता लगाम लागला आहे. भारतीय शेअर मार्केटमधील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. आशियाई शेअर बाजारामध्ये (Share Market) सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून आला आहे. देशांतर्गत बाजारावर दबाव प्री- ओपन सत्रातूनच स्पष्टपणे दिसून आला आहे. प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ३७० अंकांनी घसरला आहे. सिंगापूरमध्ये (Singapore) SGX निफ्टी ०.६९ टक्क्यांनी घसरला आहे. सकाळी ९:१५ वाजेच्या सुमारास सत्र सुरू होताच सेन्सेक्स सुमारे ४८० अंकांनी घसरला आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर काही मिनिटांच्या व्यवहारातच बाजाराची घसरण थोडी कमी झाली आहे. सकाळी ९:२५ वाजता, सेन्सेक्स सुमारे ३२० अंकांनी घसरला होता आणि ६० हजार अंकांवरून सुमारे १५० अंकांनी खाली आला होता. निफ्टी देखील ७५ पेक्षा अधिक जास्त अंकांनी खाली ११७,८९० अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. आज, शेअर मार्केटवर दबाव कायम राहण्याचा अंदाज आहे. या अगोदर काल शेअर मार्केटमध्ये नफेखोरी दिसून आला. मंगळवारी बाजारात व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स ४३५.२४ अंकांनी घसरून ६०,१७६.५० अंकांवर बंद करण्यात आला होता.

Share Market Latest News Updates
महिला IPS अधिकाऱ्याच्या घरातच चोरी; धक्काबुक्की करत मारहाण

निफ्टीमध्ये (Nifty) ९६ अंकांच्या घसरणीसह १८ हजार अंकांच्या खाली घसरला आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी, शेअर मार्केट वधारला होता. सोमवारी सेन्सेक्स १,३३५.०५ अंकांनी म्हणजेच २.२५ टक्क्यांनी वधारत ६०,६११.७४ वर आणि निफ्टी ३८२.९५ अंकांनी वधारत १८,०५३.४० वर बंद झाला आहे. एनर्जी, मेटल्स वगळता इतर सर्व क्षेत्रात निर्देशांकात घसरण होत असल्याचे चित्र आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअरमध्ये तेजी सुरू आहे. बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, फार्मा सारख्या क्षेत्रात घसरण असल्याचे दिसून येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com