PUne Hadapsar Crime News Saam TV
मुंबई/पुणे

टॉयलेटमध्ये घुसून तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोग्यमंत्र्यांच्या हॉस्टेलमधील धक्कादायक घटना

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हडपसर हांडेवाडी रोड येथील (JSPM) कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव -

पुणे: राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या हडपसर हांडेवाडी रोड येथील जेएसपीएम (JSPM) कॉलेजमधून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने कॉलेजमधील लेडीज हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये घुसून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे कॉलेजसह शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, JSPM कॉलेजमधील मुलींच्या होस्टलमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वछातागृहाचं सुरु होतं. काम करायला आलेल्या कामगारानेच एक तरुणी टॉयलेटमध्ये गेली असता, तिच्यावरती अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या शिक्षण संस्थेत असा प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुलींसह त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये (Wanwadi Police Station) अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी ही घडली असून अजूनही आरोपीला अटक झालेली नसून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

पिपाणी गेली, तुतारी राहिली! शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आयोगाचा दिलासा

SCROLL FOR NEXT