माणुसकी आटतेय : पुण्यात लहानग्याला कपडे काढून डोक्यातून रक्त येईपर्यंत मारहण; पहा व्हिडीओ अश्विनी जाधव
मुंबई/पुणे

माणुसकी आटतेय : पुण्यात लहानग्याला कपडे काढून डोक्यातून रक्त येईपर्यंत मारहण; पहा व्हिडीओ

मारहाण करताना मुलाला शर्ट-पँट काढायला लावली, त्याच्या डोक्यातून रक्त येईपर्यंत त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : येरवडा (Yerawada) भागात एका लहान मुलाला कपडे उतरवायला लावून बॅटने मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदरचा धक्कादायक प्रकार येरवड्यातील औद्योगिक शाळेच्या आवारात घडला आहे. कबुतर (Pigeon) चोरीचा आरोप करत जवळपास दहा बारा जणांच्या टोळक्या समोर त्याला मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर मुलाच्या आई वडिलांनी घेतली पोलिसात धाव घेतली आहे.

दरम्यान या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये त्या मुलाला तू आमची २२०० रुपयचं कबुतर का चोरल? असं विचारत आहेत त्यावरतू तो मुलगा मी फक्त रुममध्ये मादी होती ती पाहिली मात्र मी त्या मादीला हात नाही लावला असं म्हणतोय. तर त्याला मारणारा तू आणि भाव्याने मादी हवेमध्ये फडकवली आणि हातपण नाचवलास मग तु का खोट का बोलतोस असं म्हणत आणखी बॅट त्याच्या कंबरेत, डोक्यात आणि पायावरती देखील मारली आहे.

पहा व्हिडीओ -

शिवाय त्याने चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर केला होता दरम्यान येवढा मार खाऊन देखील त्याने आपण ती चोरी केली नसल्याचं सांगितलं तरी देखील त्या मुलाला मारतच राहिले, कबुतर घेऊन जाताना सोबत कोण होता त्या साथीदारांच नावं सांगण्यासाठी या लहानग्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे.

मारहाण करताना त्याला शर्ट-पँट काढायला लावली आणि त्याच्या डोक्यातून रक्त येईपर्यंत त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आता पुण्यातली आणि माणसांतली माणुसकी आटली की काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

SCROLL FOR NEXT