A case has been filed against Mumbai former mayor Kishori Pednekar in Covid center scam Saam TV
मुंबई/पुणे

Kishori Pednekar News: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Kishori Pednekar: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी महापौर यांच्याविरोधात मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

A case has been registered against Kishori Pednekar: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी महापौर यांच्याविरोधात मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

सोबतच महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल केला जात आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून यामध्ये किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी केली होती.

ईडीने महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी देखील केली होती. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉडी बॅग खरेदीत घोटाळ्याचा आरोप

मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या.

ईडीने २१ जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात ६८ लाख ६५ हजार रुपये रोकड, १५० कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. या शिवाय १५ कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती.

ईडीने मारलेल्या छाप्यात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह १० ते १५ जणांचा समावेश होता. दरम्यान किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामती ही पवारांची आहे- श्रीनिवास पवार

Maharashtra Election Result : राज ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, ३ आमदार न आल्यास आयोग मोठा निर्णय घेणार, निकष काय?

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

SCROLL FOR NEXT