आईला बेशुद्ध करुन भांडी विकणाऱ्या महिलांनी पळवलं 3 महिन्याच बाळ; महिला CCTV मध्ये कैद सुरज सावंत
मुंबई/पुणे

आईला बेशुद्ध करुन भांडी विकणाऱ्या महिलांनी पळवलं 3 महिन्याच बाळ; महिला CCTV मध्ये कैद

जुन्या मोबाईलवर बास्केट देण्याच्या नावाखाली एक महिला घरात शिरून पाठमोरी उभ्या असणाऱ्या आईला पाठीमागून गुंगीच्या औषधाचा रुमाल तोंडाला लावला.

सुरज सावंत

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) घोडपदेव परिसरात दिवसा ढवळया एका आईला गुंगीचे औषध देऊन 3 महिन्याच्या बाळाचे अपहरण (Abduction) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हे देखील पहा -

ज्यां घरातील बाळ चोरलं आहे ते मगदूम कुटुंब घोडपदेव येथे असणाऱ्या संघर्षसदन इमारती मधील पहिल्या मजल्यावर रहातात. मुलीचे वडील बजरंग मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडे अकराच्या वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात (Kalachauki police station) दोन अनोळखी भांडी विकणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

जुन्या मोबाईलवर (Mobile) बास्केट देण्याच्या नावाखाली एक महिला घरात शिरून पाठमोरी उभ्या असणाऱ्या आईला पाठीमागून गुंगीच्या औषधाचा रुमाल तोंडाला लावला. ती बेशुद्ध पडताच त्यांनी घरामध्ये असणाऱ्या अवघ्या 3 महिण्याच्या बाळाच अपहरण केलं.

दरम्यान सदरचा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून CCTV फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपी महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या चिमुकलीला पाहिल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Sleep Health: अचानक चिडचिड वाढतेय आणि स्क्रिन टाईमपण वाढलाय? ८ वर्षांच्या संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! बर्थडे सेलिब्रेशनवेळी ५ मित्रांनी तरुणाला पेट्रोल टाकून पेटवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Mumbai School : घोडा, गाडी, पैसे नव्हे चक्क मुंबईत मराठी शाळाच गेली चोरीला, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT