Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध देऊन एका २३ वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. आरोपींनी इतक्यावरच न थांबता पीडितेचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचं जबरदस्तीने लग्न देखील लावलं. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)
अभिमन्यु दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोली, कपील, सागर, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यातील (Pune) सहकारनगर परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि अभिमन्यू शेरेकर हे दोघे ही एकमेकांचे मित्र आहेत.
एके दिवशी अभिमन्यू याने तरुणीला घरी बोलावले होते. यावेळी आरोपीने पीडित तरुणीला कोल्ड्रिंक्स प्यायला दिलं. कोल्ड्रिक्स पिताच तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी अभिमन्यू याने तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावर न थांबता त्याने पीडित तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील काढले.
ज्यावेळी पीडितेला शुद्ध आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. यावेळी आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिला समजलं. दरम्यान, आरोपी अभिमन्यू याने याची वाच्यता कुणाजवळ केल्यास तुझे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी पीडितेला दिला. तसेच तुझ्या आई-वडीलांनाही मारुन टाकू, अशी धमकी दिली. (Maharashtra News)
दरम्यान, आरोपीने अश्लील फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून पीडितेला ब्लॅकमेल केलं. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेत पीडित तरुणीवर बलात्कार केला. एप्रिल २०२२ मध्ये अभिमन्यूच्या मित्र प्रशांत कोळी आणि वाहनचालक यांनी पीडितेला ठाण्याला नेले. तिथे जबरदस्तीने तिचे लग्न अभिमन्यु याच्याबरोबर लावलं.
पीडित तरुणीने फोटो डिलीट करण्याचे सांगितले असता, अभिमन्युचा भाऊ उदयन शेरेकर आणि वडील दिलीप शेरेकर यांनी तिला मारहाण केली. तुझ्या आईवडिलांना मारुन टाकू अशी धमकीही दिली. या सगळ्या प्रकारानंतर पीडित तरुणीने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.