Jalgaon News: हरवलेल्‍या मनोरुग्ण पत्नीची बातमी मिळाली; भेट होताच पती धाय मोकलून रडला

हरवलेल्‍या मनोरुग्ण पत्नीची बातमी मिळाली; भेट होताच पती धाय मोकलून रडला
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

मेहुणबारे (जळगाव) : वाट चुकलेल्या मनोरुग्ण महिलेने रेल्वेसह अन्य वाहनातून प्रवास करत चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील उंबरखेड गाठले. उंबरखेडच्या महिला पोलीस पाटील अर्चना मोरे यांनी त्या महिलेची दखल घेत दोन दिवस देखभाल करुन तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. मेहुणबारे येथे पोलिसांच्या (Police) साक्षीने महिलेला पतीच्या स्वाधीन करण्यात आले. पती- पत्नीची भेट झाल्यावर परस्परांच्या गळ्यात हुंदके देत दोघेही रडत होते. (Letest Marathi News)

Jalgaon News
Nanded News: नाव त्‍याचे चतुर..सुटाबुटात पाहुणा बनून लग्‍नात आला; थक्‍क करणारा केला प्रकार, सीसीटीव्‍हीमध्‍ये झाला कैद

रायगड जिल्ह्यातील उतेखोल आवडी (ता. माणगाव) येथील रहीवाशी असलेल्या मनोरुग्ण महीला आशा बबन जाधव ही ४ फेब्रुवारीपासून घरातुन कुणालाही काही न सांगता निघून गेली होती. वाट चुकलेली आशा जाधव ही थेट रेल्वेने चाळीसगाव शहरात पोहचली. शहरात सर्व अनोळखी वाटत असल्याने तिला जिकडे रस्ता मिळेल तिकडे पायी चालत गेली. पायी चालत चालत आशाने उंबरखेडे (ता. चाळीसगाव) गाव गाठले. गावाच्या बाहेर असलेल्या युवराज मोरे यांच्या शेतात रात्री थांबली.

महिला पोलिस पाटीलने ठेवले घरी

६ फेब्रुवारीला सकाळी युवराज मोरे शेतात गेल्यावर त्यांना ही महिला दिसली. त्यांनी गावात येऊन ही घटना सांगितली. भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेला गावातील पोलीस पाटील अर्चना मोरे यांनी गावात आणले. यानंतर या महिलेला मेहुनबारे या पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाडांनी माहिती घेतली. शोध लागेपर्यंत महिलेला पोलीस पाटील अर्चना मोरे यांनी स्वतःच्या घरी ठेवायची जबाबदारी घेतली.

पतीचे अश्रू अनावर

पाच दिवसांपासून बेपत्ता झालेली पत्नी कुठे गेली असेल? या चितेंत पती बबन यांनी रायगड जिल्ह्यातील वरकाड, नागटणे, रोहा, वाकड, पोलांड, इंदापूर, तांबडी, म्हागाव, वाशीसह अनेक गावात शोध घेतला. मात्र त्यांची पत्नी मिळत नव्हती. बबनला पत्‍नीची माहिती पोलिसांकडून मिळाल्‍यावर मेहुणबारे पोलीस ठाण्यात पोहचला. पत्नीला पाहुण डोळ्यातुन अश्रु पाडत धाय मोकलून रडला. यावेळी पोलीस ठाण्याचे भुषण बाविस्कर, सुदर्शन घुले, धर्मराज पाटील, निलेश लोहार, रुषीकेश जगताप, उमेश निकम आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com