Kalyan GST Scam News Updates प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याणात 90.43 कोटींचा GST घोटाळा! एकास बेड्या

मुख्य सूत्रधार बदमाश्याच्या पोलिस मागावर...

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : जीएसटी पोर्टल आणि संगणक प्रणालीमध्ये फेरफार करून कल्याणमधील एका व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून, तसेच शासनाची तब्बल 90 कोटी 43 लाख 70 हजार 194 रूपयांची फसवणूक करणाऱ्या एकास आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. (Kalyan GST Scam News Updates)

जीएसटी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अद्याप हाती लागला नसून पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा कस्सून शोध घेत आहेत. आकाश संतोष आडांगळे असे आरोपीचे नाव असून त्याला आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी संध्यकाळी 7.40 वाजता अटक केली. या आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने त्याला 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेकडील लाल चौकीजवळच्या फडके मैदानासमोरील निलकंठ धारा सोसायटीत राहणारे किशन चेतन पोपट यांच्या फिर्यादीवरून कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात 9 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेता हा गुन्हा पुढील तपासाकरिता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाचे चौकस तपास सुरू केला. तपासादरम्यान या पथकापुढे धक्कादायक माहिती आली. या प्रकरणातील तक्रारदार व्यापारी किशन पोपट यांनी राजेश उर्फ किरण राव यास त्याच्या मालकीच्या श्रीकृष्णा इनव्हेस्टमेंट या फर्मच्या नावे जीएसटी क्रमांक काढण्यासाठी, तसेच जीएसटीसाठी त्याचा स्वत:चा मोबाईल नंबर व स्वत:चा ई-मेल आयडी असा लिंक करण्यासाठी सांगितले.

हे देखील पहा-

त्या कामाची फी म्हणून 13 हजार रूपये किशन पोपट यांनी राजेश उर्फ किरण राव याला दिले. त्याप्रमाणे राजेश उर्फ करण राव याने व्यापारी किशन पोपट यांच्या कंपनीच्या नावे जीएसटी 27EZUPP1327Q1ZC असा क्रमांक काढला. परंतु त्यानंतर व्यापारी किशन पोपट यांच्या संमतिशिवाय राजेश उर्फ करण राव याने जीएसटी पोर्टलमध्ये व संगणक प्रणालीमध्ये फेरफार करुन मोबाईल नंबर ज्याचे शेवटचे 04 अंक 2879 असा व ई-मेल आयडी ज्याची शेवटची अक्षरे 4@gmail.com असे लिंक करुन 5 अब्ज 2 कोटी 42 लाख 70 हजार 194 रुपयांचा आर्थिक व्यवहार तर केलाच, शिवाय सदर व्यवसायाची जीएसटी रक्कम म्हणून 90 कोटी 43 लाख 70 हजार 194 रूपये महाराष्ट्र शासनाकडे न भरता व्यापारी किशन पोपट आणि शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिकदृष्ट्या सखोल तपास केला. कल्याणकर व्यापारी किशन पोपट यांच्या कंपनीच्या जीएसटी क्रंमाकास लिंक असलेल्या ई-मेल आयडीबाबत तपास सुरू असतानाच राजेश ऊर्फ करण राव आणि आकाश आडांगळे ही दोन नावे निष्पन्न झाली. यातील आकाश आडांगळे याला पोलिसांनी अटक केली. मात्र या फसवणूक कांडातील मुख्य सूत्रधार राजेश ऊर्फ करण राव हा अद्याप हाती लागला नाही.दरम्यान शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update अमरावतीत 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा

माता न तू वैरिणी! चिमुकलीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच आई...; ठाण्यातील खळबळजनक घटना|VIDEO

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट; २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

MNS : मराठी असूनही ते एका मराठी मुलीलाच टार्गेट करत आहेत, मनसे नेत्याच्या मुलाकडून शिवीगाळ; इन्फ्लूएन्सरने सांगितली आपबिती

Blood Pressure: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी वरदान ठरेल 'ही' एक गोष्ट

SCROLL FOR NEXT