Vijay Wadettiwar  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Land scam: कल्याणमधील 63 एकर जमीन बिल्डरच्या घशात, 7000 कोटींचा घोटाळा; विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar On Kalyan Land scam: कल्याण तालुक्यातील मौजे म्हारळ येथे सात हजार कोटींचा जमीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुनील कांबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

कल्याणमध्ये मोठा जमीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले आहेत की, कल्याण तालुक्यातील मौजे म्हारळ येथे एका कंपनीने शासकीय जमीन अनाधिकृतपणे बिगरशेती केली. म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला हाताशी धरुन, गरीब व गरजवंत शेतकऱ्‍यांची फसवणूक करुन, सुमारे सात हजार कोटी रुपयांचा सुनियोजित घोटाळा जिल्हाधिकारी, ठाणे व महसूल विभागातील अधिकारी यांच्या संगनमताने केला आहे.

या प्रकरणाची एक महिन्याच्या आत चौकशी करावी व म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला दिलेली ६३ एकर जमिन महसूल विभागाने ताब्यात घ्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभेत आज विजय वडेट्टीवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने सभागृहाचे या विषयाकडे लक्ष वेधले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेने २००८ रोजी केवळ १२ दिवसातच हा भूखंड महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने अटी व शर्तीचा भंग करुन या कंपनीला फक्त चार कोटी रुपयांमध्ये विकला. शासनास देय रक्कम रुपये १ कोटी ६८ लाख ९३ हजार १४० या कंपनीने त्यांचा सारस्वत बँक खात्यातून जमा केलेली आहे. याचाच अर्थ शासनाची जमीन सुनियोजित मार्गाने म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला समोर करुन या कंपनीने बळकावली आहे.

ते म्हणाले, ''ही कंपनी आणि अधिकाऱ्याने १२ दिवसात करारनामा करून, जमिनीचे व्हॅल्युएशन कमी दाखवून फक्त साडे चार कोटी रुपयात जमीन बिल्डरच्या घशात घातली. आणि सात हजार कोटींचा घोटाळा केला. यातून ३० हजार कोटी रुपये बिल्डर कमावणार आहे. या प्रकरणाची महसूल मंत्र्यांकडे सुनावणी झाली. त्यात एक सदस्यीय समिती नेमू आणि चौकशी करू असे महसूल मंत्र्यानी सांगितले.''

मात्र तीन महीने उलटून गेले आहेत तरी अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सदर प्रकणाची महसूल मंत्र्याच्या आदेशानुसार एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करण्यात यावी. तसेच अटी आणि शर्तीचा भंग झाल्यामुळे जमीन परत महसूल विभागाकडे जमा करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT