Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबई पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. बनावट नोटा (Counterfeit notes) तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत एक नाही दोन नाही तर तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी (police) जप्त केले आहेत. शहरामधील दहिसर (Dahisar) भागात मुंबई क्राइम ब्रांचने (Mumbai Crime Branch) ही मोठी कारवाई केली आहे. (7 crore counterfeit notes seized Mumbai Police action)

हे देखील पहा-

एका आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईचा (action) पर्दाफाश झाल्यावर एकच खळबळ उडाली आहे. मुंबई क्राइम ब्रांचला दहिसर मध्ये ४ जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी (police) या ४ व्यक्तींवर पाळत ठेवली आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना या गाडीमध्ये २ हजारच्या रुपयांच्या बनावट नोटांचे २५० बंडल मिळाले आहेत.

२ हजारच्या रुपयांच्या एकूण २५ हजार नोटा असे एकूण ५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यानंतर सविस्तर कारवाई करून पोलिसांनी या आरोपींकडून ७ मोबाईल (Mobile) फोन, बनावट नोटा आणि १ लॅपटॉप (Laptop) जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena SC Case Live : 'धनुष्यबाण' चिन्ह शिंदेंना देणे बेकायदेशीर? ठाकरेंच्या वकिलांचा थेट निवडणूक आयोगावर प्रहार

Good News: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ऑनलाईन खरेदी करा खत, केंद्र सरकारने दिलं मोठं गिफ्ट

Testicular Cancer: अंडकोषात गाठ किंवा सूज दिसतेय? टेस्टिकुलर कॅन्सरपूर्वी शरीर देतं 4 संकेत

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरातील धीरज परदेशी हत्या प्रकरणाचा येवल्यात निषेध

ST Bus Accident : महामार्गावर थरार! धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळले अन्..., २८ जण करत होते प्रवास

SCROLL FOR NEXT