हायकोर्टाने जामीन फेटाळला; नितेश राणेंच्या पोलीस ठाण्यात येरझारा, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

आज भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जामिनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
हायकोर्टाने जामीन फेटाळला; Nitesh Rane  पोलीस ठाण्यात येरझारा, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
हायकोर्टाने जामीन फेटाळला; Nitesh Rane पोलीस ठाण्यात येरझारा, सुप्रीम कोर्टात आज सुनावणीSaam Tv
Published On

सुशांत सावंत

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये (Kankavali) शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अटकपूर्व जामिनाकरिता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे. याअगोदर हायकोर्टाने त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. मात्र, आज न्यायालयात नितेश राणे यांच्याकडून मुकुल रोहतगी हे बाजू मांडणार असल्याची माहिती मिळत आहे. (santosh parab attack case nitesh rane go supreme court declaire for prearrest)

हे देखील पहा-

दरम्यान, नितेश राणे सध्या सिंधुदुर्ग पोलिसांना (Sindhudurg Police) तपासामध्ये सहकार्य करताना दिसत आहेत. मध्यंतरी नितेश राणे हे अज्ञातवासात गेले होते. पण राज्यसरकारने न्यायालयात (Maharashtra Government) सुनावणी संपेपर्यंत अटक करणार नाही, अशी ग्वाही दिल्यावर ते माध्यमांसमोर आले होते.

हायकोर्टाने जामीन फेटाळला; Nitesh Rane  पोलीस ठाण्यात येरझारा, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी उडवला रेल्वे ट्रॅक; रेल्वेसेवा तात्काळ थांबवली

काय आहे नेमकी घटना ?

जिल्हा बँक निवडणूक प्रकरणी राजकीय संघर्षातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ल्यामागे आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता. याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये, म्हणून अगोदरच नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टातही (High Court) धाव घेतली पण दोन्हीकडे नितेश राणे यांना दिलासा मिळाला नाही. पण पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांना अटक करु नये, असे हायकोर्टाने सांगितले होते. त्यामुळे राणेंना काहीसा दिलासा मिळाला होता. पण आता त्यांनी अटकपूर्व जामिनाकरिता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com