BMC Budget 2024 Saam Digital
मुंबई/पुणे

BMC Budget 2024: मुंबई महापालिकेचा ५९९५४ कोटींचा अर्थसंकल्प सादर; मुंबईकरांना काय मिळालं?

BMC Budget 2024 News: मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा 59954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आज सादर केला. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो 10.50 टक्क्यांनी अधिक आहे.

Sandeep Gawade

BMC Budget 2024

मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा 59954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आज सादर केला. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो 10.50 टक्क्यांनी अधिक आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 54256.07 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मागील वर्षी सादर करण्यात आला होता. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष मांडतात, मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लाबंणीवर पडल्यामुळे सध्या महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान महापालिकेला मालमत्ता करातून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली असली तरी अर्थसंकल्पात आरोग्य विभाग आणि कोस्टल रोडसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे.

या क्षेत्रासाठी भरघोस निधी

मुंबई स्वच्छ, हिरवीगार आणि जगण्यासाठी आकांक्षी ठेवण्यासाठी नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी रु.31774.59 कोटींची सर्वोच्च पायाभूत सुविधा तरतूद.

'मुख्यमंत्री सखोल स्वच्छता कार्यक्रम' डिसेंबर २०२३ पासून हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेला मार्गदर्शन करण्यासाठी BMC ने 61 गुणांची मानक कार्यप्रणाली (SOP's) विकसित केली आहे.

'मुख्यमंत्र्यांचे झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी' सर्व BMC रुग्णालयांमध्ये लागू होणार आहे. औषधांच्या वेळापत्रकात सर्व आवश्यक औषधे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 500 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित

धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग आर्थिक सहाय्य योजना : BMC कार्यक्षेत्रात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी आर्थिक सहाय्य. त्यासाठी केलेली तरतूद रु.111.83 कोटी आहे.

1600 बचत गटांना प्रति गट 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य खात्यावर भर

मुंबई महानगरपालिकेच्या सायन, केईएम, नायर या रुग्णालयायामध्ये IVF उपचारपद्धती सुरू होणार आहे. ११० कोटी रुपयांचे थ्री टेसला एमआरआय मशीन मुंबई महानगरपालिका खरेदी करणार आहे. रुग्णालय व्यवस्थापन प्रणालीसाठी ३०६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 23. 46 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सन २०२४-२५ मध्ये, ६ अतिरिक्त पॉलिक्लिनीक व डायग्नॉस्टिक सेंटर्स आणि ५४ “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे - आपला दवाखाना' सुरू करण्याचा प्रस्ताव होता. तसेच, फिजिओथेरपिस्ट आणि कान, नाक, घसा तज्ज्ञांच्या सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष रुग्णालये

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, सन २०२७ पर्यंत मुंबईत कुष्ठरोग प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी दिशादर्शक आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार, मुंबईतील सर्व आरोग्य केंद्रांच्या विभागात कुष्ठरोगाच्या शून्य प्रसाराचे उद्दिष्ट गाठण्याकरिता विविध उपाययोजना अवलंबिण्यात येणार आहेत.

विशेष प्रकल्पांसाठी तरतूद

कोस्टल रोड प्रकल्प रु. 2900.00 कोटी.

दहिसर - भाईंदर लिंक रोड (कोस्टल रोड शेवटचा टप्पा) रु. 220.00 कोटी.

मुंबई कोस्टल रोड (उत्तर) वर्सोवा ते दहिसर 6 पॅकेज आहे रु. 1130.00 कोटी.

गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR) रु. 1870.00 कोटी.

सीवरेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट (STP) रु. 4090.00 कोटी.

रस्ते आणि पुलांसाठी तरतूद

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) वर ऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट राबविण्याचा प्रस्ताव आहे.

मुंबई कोस्टल रोड वर्सोवा इंटरचेंज ते दहिसर इंटरचेंज आणि GMLR बांधण्यासाठी सुमारे रु.35955.07 कोटी खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प 6 पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे जसे की A B C D E & F आणि सुमारे 48 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

कोणत्या खात्याला किती तरतूद

स्वछतादूत आणि क्लीनअप मार्शलसाठी 168 कोटी तरतूद प्रस्तावित आहे

मिठीनदी रुंदीकरण खोलीकरण ४५१.७५ कोटी

देवनार क्षेपणभूमी इथे कचऱ्यातून वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी 90 कोटी

मिठी नदीच्या बांधकामासाठी ४५१.७५ कोटी

मोठे नालेसफाईसाठी - ९३ कोटी

छोटे नालेसफाईसाठी - १०५ कोटी

मिठी नदीच्या सफाईसाठी - ४५ कोटी

पर्जन्य जलवाहिण्यांच्या कामांसाठी - 1930 कोटी

मुंबई अग्निशमन दलाला 232 कोटींची तरतूद करण्यात आली आहे

मुंबई महापालिका मंडयांसाठी 105 कोटी तरतूद करण्यात आली आहे

आश्रय योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना ३०० स्क्वेअर फूटांची सेवा निवासस्थाने (क्वॉर्टर्स) देण्यात येणार आहेत.या योजनेअंतर्गत १२ हजार निवासस्थांची निर्मिती होणार

यंदाच्या अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद

इमारत परीक्षण खात्यासाठी 355.92 कोटी

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरिताकरण प्रकल्प मुंबईत राबवला जाणार, ज्याअंतर्गत मुंबईत अधिकाधिक बांबू वृक्षारोपण करण्याचा पालिकेचा विचार

पूर्व द्रुतगती महामार्गावर भांडूप ते कन्नमवार नगरपर्यंत १७८ कोटी

राणीच्या बागेसाठी ७४ कोटी

मगर आणि सुसर यांच्यासाठी अंडर वाॅडर प्रदर्शनीचे बांधकाम करण्यात येणार.आशियातील सर्वात मोठी आणि एकमेव प्रदर्शनी असणार

2024-25 साली 4 नवीन CBSC शाळा सुरू होतील.

ICSE आणि CBSC च्या 12 शाळांमध्ये व इयत्त्ता 2 ते इय्यता 6 दुसरी तुकडी सुरू करणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT