Raj Thackeray News : 'सत्ता कायम राहत नाही, सध्याचं राजकारण भाजपला परवडणार नाही', राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray News : देशात सुरु असलेलं अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपला देखील परवडणार नाही. कारण सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेलं नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam Tv
Published On

Raj Thackeray PC :

राज्यात आणि देशात विरोधी पक्षांच्या नेत्यांना केंदीय तपास यंत्रणा ईडीकडून जोरदार कारवाई सुरु आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री यांना देखील ईडीने समन्स बजावलं आहे.

राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी ईडी चौकशी सुरु आहे. ईडीच्या या कारवाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे.

Raj Thackeray
Mumbai Politics : मुंबईत काँग्रेसला खिंडार? बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता

देशात सुरु असलेलं अशा प्रकारचं राजकारण भविष्यात भाजपला देखील परवडणार नाही. कारण सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेलं नाही. उद्या सत्ता गेली तर काय होईल याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे. इंदिरा गांधींचा दाखला देत तुम्ही हे असं किती दिवस करणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टोलचा पैसा अनेक पक्ष निधीसाठी वापरला जातो

उद्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. मुंबईतील टोलनाक्यावरील आम्ही जे चित्रण केलंय ते त्यांच्या समोर ठेवणार आहे. टोलमधून जमा होणाऱ्या पैशाबाबत मोठा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला आहे. टोलचा पैसा अनेक पक्षांना पक्ष निधीसाठी वापरला जातो. मलाही ऑफर आली होती, मी म्हटलं इथेच मारेल तुला, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

Raj Thackeray
Uddhav Thackeray: भाजपच्या किती कार्यकर्त्यांवर ईडीची कारवाई झाली? उद्धव ठाकरेंचा सवाल; भरत गोगावलेंवर साधला निशाणा

प्रत्येक निवडणूक वेगळी असते, ठोकताळे मांडता येत नाहीत. जे मोठ्या प्रमाणात मतदान होत, बॉम्ब ब्लास्ट, बाबरी मशिद त्यावेळी रागातून मतदान होतं. आज राम मंदिर पूर्ण झालंय, त्याच समाधान आहे. पण तेवढच मतदान भाजपला होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे काय होईल सांगता येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com