Uddhav Thackeray: भाजपच्या किती कार्यकर्त्यांवर ईडीची कारवाई झाली? उद्धव ठाकरेंचा सवाल; भरत गोगावलेंवर साधला निशाणा

Uddhav Thackeray Sabha Raigad: "कोरोना काळात मी माझ कुटुंब माझी जबाबदारीची घोषणा केली होती पण त्याने पण काहींना डोकेदुखी आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ईडी कारवाईवरुन सरकारवर टीका केली.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Newssaam tv
Published On

सचिन कदम, रायगड|ता. २ फेब्रुवारी २०२४

Uddhav Thackeray Speech:

राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रायगडमध्ये जनसंवाद दौरा सुरू आहे. आज पोलादपूर येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"मी कालपासून इथं आहे मी काय काय केलं हे गिते साहेबांनी सांगितलं. कोरोना काळात मी माझ कुटुंब माझी जबाबदारीची घोषणा केली होती पण त्याने पण काहींना डोकेदुखी आहे. काहीजण दारात जातात, तेव्हा लोक म्हणतात अरे हड..." असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली.

तसेच "रायगडने अनेकांना झुकवलं आहे, तानाजी मालुसरे यांची ही भूमी आहे. इथं झेंडा बाजूला आणि नॅपकिन पुढं पुढं. जॅकेट घेतली पण काहीही झालं नाही भावी पालकमंत्री म्हणूनच राहिले, " असे म्हणत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यावरही ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray News
Madha: महायुतीमधील वाद चव्हाट्यावर; रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिली तर रामराजे बंडाच्या पवित्र्यात?

"आम्ही गॅरंटी म्हणत नाही, आम्ही प्रामणिकपणे काम करतो. चौकशी करायची असेल तर मुंबई पालिकेची नको पीएम केअर फंडची करा. प्रफुल्ल पटेल तुमच्यासोबत आल्यावर त्यांच्यावरील कारवाईचे काय झाले. महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले नेते मुग नव्हे खोके गिळून गप्प झालेत. आता आपल्याला सर्व थोतांडाना उत्तर द्यायची आहेत, माझा पक्ष चोरला आता माझ्या लोकांच्या मागे लागलेत, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray News
Dhule Crime News: धुळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट; रात्रीच्या अंधारात थेट एटीएमवर मारला डल्ला, लाखोंची रोकड लंपास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com