BMC Budget 2023-24
BMC Budget 2023-24 Saam TV
मुंबई/पुणे

BMC Budget 2023-24: मुंबई महानगरपालिकेचा 50 हजार कोटींचा अर्थसंकल्प आज होणार सादर ;मुंबईकरांच्या अपेक्षा होणार का पूर्ण?

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बादवे

BMC Budget 2023-24: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा 50 हजार कोटींचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, कचरा आणि कर हे घटक केंद्रस्थानी असणार आहेत. गेल्या वर्षी हा अर्थसंकल्प 45 हजार कोटींचा होता. (Latest BMC Budget 2023-24 News)

यंदा स्थायी समिति अध्यक्षांऐवजी अतिरिक्त आयुक्त महापालिका आयुक्त हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पुढच्या काही महिन्यात पालिका निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मार्च 2022 मध्ये मुंबई महानगरपालिकेवरील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या हाती मुंबई महानगरपालिकेचा कारभार आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी असलेल्या विषयांसह कोस्टल रोड, शहारांमध्ये वाढत चाललेली गर्दी लक्षात घेता नवीन उड्डाणपुल, आरोदग्य, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शिक्षण यावर आज भाष्य केलं जाणार आहे.

2030 पर्यंत शून्य कचरा अभियान

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात 2030 पर्यंतच्या शून्य कचरा अभियानासाठी देखील तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये घाणीचे साम्राज्य कमी करण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. यासाठी पावसाळ्यात नवीन ड्रेनेज लाईन, नद्या, नाले यांचे निर्जंतुकीकरण, डबक्यांमध्ये पाणी साचूनये यासाठी उपाययोजना यासाठी आर्थिक तरतूदीची गरज आहे. त्यामुळे कोणत्या घटकांना पालिका किती आर्थिक तरतूद करते हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये शांतिगीरी महाराज यांनी भरला शिंदे गटाकडून अर्ज?

PM मोदींच्या सभेने काही फरक पडणार नाही, कोल्हापुरकरांचा निर्णय पक्का; मालोजीराजे छत्रपतींना विश्वास, Video

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला उमेदवारी अर्ज?

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

SCROLL FOR NEXT