Building collapsed in Bhiwandi Saam tv
मुंबई/पुणे

Bhiwandi Building Collapse Update: भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, गुन्हा दाखल करत मालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest News: या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी (Bhiwandi Police) गुन्हा दाखल करत इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेतले आहे.

Priya More

Bhiwandi News: ठाण्यातील (Thane) भिवंडीमध्ये शनिवारी 3 मजली इमारत कोसळल्याची (Bhiwandi Building Collapsed) घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली 22 जण अडकले होते त्यापैकी 14 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी (Bhiwandi Police) गुन्हा दाखल करत इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेतले आहे.

भिवंडीच्या वडपाळा परिसरात असणारी तीन मजली इमारत शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक कोसळली. या दुर्घटनेमध्ये सुरुवातीला 3 जणांचा मृत्यू झाला होता. पण आता मृतांचा आकडा वाढत चालला असून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 10 जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आले आहे. इतर जणांचा शोध सुरु आहे. एनडीआरएफच्या टीमकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. जेसीबीच्या साह्याने मलब्याचे उपसण्याचे काम सुरु आहे. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या नारपोली पोलिसांनी इमारत बांधणाऱ्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.

नारपोली पोलिसांनी इमारत मालक इंद्रपाल पाटील यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (2), 337, 338 आणि 427 नुसार गुन्हा दाखल केला आहे. इंद्रपाल पाटील यांनी 2014 मध्ये ही इमारत बांधली होती. या इमारतीमध्ये अनेक खोल्या या दुकानदार आणि रहिवाशांना भाड्याने देण्यात आल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, या कुमकुवत झालेल्या इमारतीवर मोबाईलचा टॉवर उभारण्यात आला होता. या इमारतीत तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर एका कंपनीचं गोडाऊन होते. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर रहिवासी खोल्या होत्या. ज्यामध्ये काही नागरिक भाड्याने राहत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या इमारत दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य शासन करेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी रात्री अकरा वाजता घटनास्थळाला भेट देत पाहणी केली होती. यावेळी त्यांनी इमारतीच्या ढिगार्‍याखाली (building collapse) अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना बचाव पथकाला दिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: अमरावतीत युवक काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT