Mumbai Crime News: IT कंपनीसाठी भाड्याने घेतलेल्या १७५ लॅपटॉपचा अपहार करुन फरार; गुन्हा दाखल

वनराई पोलीस आरोपी आरोपीच्या शोधात
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv

संजय गडदे

Crime News: मुंबईच्या गोरेगांव पुर्वेकडील आयटी कंपनीसाठी भाड्याने घेतलेल्या तब्बल १७५ लॅपटॉपचा अपहार करुन फरार झालेल्या व्यावसायिकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या १७५ लॅपटॉप ची किँमत ३५ लाख रुपये इतकी असल्याचं बोलले जात आहे. याप्रकरणी मनोज शामनारायण गौड या मित्राविरुद्ध वनराई पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वनराई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Nashik News: ईपीएफ पेंशनर्स धारकांचे थाळीनाद आंदोलन; केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरावर धडक

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपेश सुरेश रहाटे आणि आरोपी मनोज गौड हे दोघेही मित्र असून दोघांनीही पूर्वी एकाच कंपनीत काम देखील केले. नंतर या दोघांनी कंपनीचा राजीनामा देऊन स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु केला. फिर्यादी रुपेश याने संगणक रिपेरिंगसह भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केल्याची माहिती मनोजला होती. त्यामुळे या दोघांनी व्यवसायात एकमेकांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

गेल्या वर्षी आरोपी मनोज गौड याने रुपेश रहाटे याला फोन करून आयटी कंपनीसाठी १७५ संगणक किंवा लॅपटॉप (Laptop) भाड्याने हवे असल्याचे सांगितले. यातून चांगली कमाई होईल ते लॅपटॉप तू पुरवावेत. मी कंपनीत जुगाड करून तुझे लॅपटॉप तिथे भाड्याने देण्याची व्यवस्था करतो असे मनोज याने रुपेशला सांगितले. (Mumbai Crime News)

रुपेश ने देखील इकडून तिकडून १७५ लॅपटॉप गोळा करून मनोज गौड यास दिले. या दोघांमध्ये एक भाडेकरार देखील झाला यानुसार प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला भाडे देण्याचे कबूल करण्यात आले. ठरल्याप्रमाणे मनोजने दोन महिने प्रत्येकी ५० हजार रुपये भाडे दिले. मात्र नंतर भाडे देणे बंद केले.

Mumbai Crime News
Mumbai Vaccination Update: मुंबईत सोमवारी कोरोना लसीकरण राहणार बंद, नागरिकांनी सहकार्य करण्याचे BMC कडून आवाहन

ठरल्याप्रमाणे त्याला मनोजकडून नोव्हेंबरचे २ लाख ९ हजार तर डिसेंबर महिन्यांचे ४ लाख ९ हजार भाडे देणे बाकी होते. मात्र त्याचा फोन बंद येत होता. त्याच्या भावाकडे चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे ऑफिस इतर ठिकाणी शिफ्ट केल्याचे समजले. मात्र तो कुठे गेला आहे याबाबत त्यांनाही काहीच माहित नव्हती.

३५ लाखांच्या १७५ लॅपटॉपचा परस्पर अपहार करून फसवणूक केल्याचे लक्षात येताच रुपेश रहाटे याने मनेज गौडविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली. तक्रारीवरून मनोज गौड विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वनराई पोलीस (Police) आरोपी मनोज गौड याचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com