Mumbai Vaccination Update: मुंबईत सोमवारी कोरोना लसीकरण राहणार बंद, नागरिकांनी सहकार्य करण्याचे BMC कडून आवाहन

Latest News: मुंबईकर नागरिकांनी कृपया महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील बीएमसीकडून (BMC) करण्यात आले आहे.
Mumbai Vaccination
Mumbai Vaccination Saam TV

Mumbai News: कोरोनाचा (Corona Virus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. कोरोना रुग्णांचा (Corona Patient) वाढता आकडा रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून शुक्रवारपासून नाकावाटे कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. या लसीकरण मोहिमेला (Vaccination) नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशामध्ये सोमवारी म्हणजे 1 मे रोजी हे लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) देण्यात आली आहे.

Mumbai Vaccination
Rohit Sharma: ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्मा बद्दल फारशा माहित नसलेल्या ५ गोष्टी

बृहन्मुंबई महानगरपालिकाने दिलेल्या माहितीनुसार, 'मुंबईतील सर्व महानगरपालिका केंद्रांवर सोमवारी, 1 मे 2023 रोजी कोविड लसीकरण बंद राहणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने कोविड सोमवारी मुंबईत कोविड लसीकरण बंद राहणार आहे. मंगळवार, 2 मे 2023 पासून कोविड लसीकरण पूर्ववत सुरू राहील.' मुंबईकर नागरिकांनी कृपया बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालिकेकडून करण्यात आले आहे.

Mumbai Vaccination
Chhatrapati Sambhajinagar News: विकृतीचा कळस! माथेफिरू तरुणाकडून कुत्र्याची चाकूने भोसकून हत्या; संतापजनक घटनेचा VIDEO व्हायरल

28 एप्रिल 2023 पासून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) ही लस 60 वर्ष वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून दिली जात आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लस देता येणार नसल्‍याचे देखील स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

Mumbai Vaccination
Mann Ki Baat 100th Episode: 'मन की बात' कार्यक्रम आज देशाची एक परंपरा झाली आहे : पंतप्रधान मोदी

दरम्यान, मुंबईत महानगर पालिकेच्या 24 केंद्रामध्ये ही लस दिली जात आहे. पण मुंबईत इन्कोव्हॅक लसीकडे मुंबईकरांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी फक्त 23 जण पहिल्या दिवसाचे लाभार्थी होते. 16 लसीकरण केंद्रावर एकाही नागरिकाने लस घेतली नसल्याचे पाहायला मिळाले. तर काही लसीकरण केंद्रावर लस साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना घरी परत जावे लागले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com