गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत 5 मुले बुडाली; दोघांना वाचविण्यात यश, तिघे बेपत्ता
गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत 5 मुले बुडाली; दोघांना वाचविण्यात यश, तिघे बेपत्ता Saam Tv
मुंबई/पुणे

गणेश विसर्जनादरम्यान मुंबईत 5 मुले बुडाली; दोघांना वाचविण्यात यश, तिघे बेपत्ता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - संपूर्ण राज्यभरात गणपती बाप्पला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. मात्र, सगळीकडे भक्तिमय वातावरण असताना काही ठिकाणी या विसर्जनाला गालबोट लागले. मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनारी कल रात्रीच्या सुमारास 5 मुले पाण्यात बुडाली. त्यातील दोन मुलांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आहे.

तर तीन मुले अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या बेपत्ता मुलांचा स्थानिक पोलीस, पालिका, अग्निशामक दल आणि तटरक्षक दलाच्या माध्यमातून शोध सुरु आहे. तसेच नौदलाचीही मदत घेण्यात येत आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्यामुळे या मुलांना शोधण्यास अडथळा निर्माण होत आहे.

हे देखील पहा -

प्राप्त माहितीनुसार, गणपती विसर्जनादरम्यान अंधेरीच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे. विसर्जनावेळी 5 मुले खोल समुद्राच्या दिशेने गेली. मुलांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाचही मुले पाण्यामध्ये बुडाली.

ही घटना निदर्शनास येताच तेथील नागरिकांनी तात्काळ धाव घेत या मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. या नागरिकांना दोन मुलांना वाचवण्यात यश आले, मात्र 3 मुलांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने विसर्जनादरम्यान तैनात केलेल्या जीवरक्षक तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने बेपत्ता मुलांचा शोध घेतला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मुंबई, ठाण्यासह राज्यातील 'या' भागात कोसळणार तुफान पाऊस; IMD कडून अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

Madhuri Dixit : माधुरीच्या सौंदर्याने 'हे' दिग्गज अभिनेते झाले होते घायाळ, मात्र ती पडली डॉक्टरांच्या प्रेमात

Daily Horoscope: या राशींनी सतर्क राहा, ताण-तणावावर नियंत्रण ठेवा; वाचा आजचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: कन्यासह ४ राशीसाठी बुधवार खास, तुमची रास?

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

SCROLL FOR NEXT