Crime: साडेचार वर्षात पुणेकरांची 42 कोटीची वाहने चोरीला!
Crime: साडेचार वर्षात पुणेकरांची 42 कोटीची वाहने चोरीला! सागर आव्हाड
मुंबई/पुणे

Crime: साडेचार वर्षात पुणेकरांची 42 कोटीची वाहने चोरीला!

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सागर आव्हाड

पुणे : दिवसेंदिवस पुण्यात वाहन चोरीचे प्रकार वाढत असून, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसत आहे. मागील साडेचार वर्षात तब्बल 42 कोटी 42 लाख 37 हजारांची साडेसात हजार वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांचा समावेश आहे. यापैकी केवळ 15 कोटी 54 लाखाची वाहने चोरट्यांकडून परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. साधारण वर्षाला शहरातून 9 कोटीची वाहने चोरीला जातात. मात्र समर्थ पोलिसांनी हे रोखण्यासाठी सीसीटीव्ही संपूर्ण हद्दीत बसवले आहेत .

हे देखील पहा-

दिवसाला कमीत-कमी चार वाहने चोरीला जात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी कोरोना संसर्गच्या कालावधीत देखील 977 वाहने चोरीला गेली होती. तर यंदा चालू वर्षाच्या साडेसात महिन्यातच 869 पेक्षा अधिक वाहने चोरीला गेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत निश्चितच हे प्रमाण अधिक आहे.

पुणे शहरात Pune City वाहनांची संख्या मोठी आहेत. त्यातही दुचाकीची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुण्यात वाहन चोरीमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षापासून वाहन चोरी ही पुणे पोलिसांसमोरील डोकेदुखी ठरली आहे. आम्ही सीसीटीव्ही बसवले आहेत .

चोरांनी वाहन चोरीचा धडाकाच लावल्याचे दिसून आले आहे. कधी-कधी दिवसाला सहा ते सात वाहने चोरीला जाऊ लागले आहेत. पण, या वाहन चोरांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागिरकांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. शहरातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र त्या तुलनेत पोलिसांना चोरीला गेलेल्या वाहनांचा छडा लावण्यात अर्ध्यापेक्षा कमी यश येताना दिसून येते आहे. जिल्ह्यात किंवा परराज्यात देखील विक्री केली जाते. त्यामुळे त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसून येते.

वाहन चोरीची काही कारणे;

- दारुची तस्करी करण्यासाठी

- घरफोड्या करण्यासाठी

- सोनसाखळी चोरी (चैनस्नॅचींग) करण्यासाठी

- वाहने चोरी करू विक्री करणारी टोळकी

- मौजमजा करण्यासाठी

2021 (20 ऑगस्ट अखेर)

कोणत्या झोन मध्ये किती गाड्या;

परिमंडळ एकः 89

परिमंडळ दोनः 132

परिमंडळ तीनः 170

परिमंडळ चारः 196

परिमंडळ पाचः 282

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

SCROLL FOR NEXT