Drugs Case : ड्रग्ज तस्करीचे कर्दनकाळ समीर वानखेडेंना अटकेची भीती?

महाराष्ट्रासह गोव्यात ड्रग्ज तस्कराचे कर्दन काळ म्हणून ओळखले जाणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टट समीर वानखडे सध्या चर्चेत आहेत.
Drugs Case : ड्रग्ज तस्करीचे कर्दनकाळ समीर वानखेडेंना अटकेची भीती?
Drugs Case : ड्रग्ज तस्करीचे कर्दनकाळ समीर वानखेडेंना अटकेची भीती?Twitter/@ANI

सुरज सावंत

मुंबई: महाराष्ट्रासह गोव्यात ड्रग्ज तस्कराचे कर्दन काळ म्हणून ओळखले जाणारे एनसीबीचे NCB झोनल डायरेक्टट समीर वानखडे Sameer Wankhede सध्या चर्चेत आहेत. आतापर्यंत त्यांचा कारवाईचा माध्यम आणि सोशल मिडियावर चांगलाच बोलबाला होता. मात्र कार्डिलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात पंच राहिलेल्या प्रभाकर साईल Prabhakar Sail यांने या कारवाईची पोलखोल केल्याने समीर वानखडे यांना आता अटकेची भिती वाटू लागल्याचं दिसतयं... म्हणूनच की काय वानखडे यांनी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे Hemant Nagrale यांना पत्र लिहित आपल्याला या प्रकरणात अडकवले जात असून कारवाई न करण्याचे पत्र लिहिले आहे.

ऑक्टोबर रोजी समीर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली NCBने कार्डिलिया क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर कारवाई केली. या कारवाईत अभिनेता शाहरूख खानचा Shahrukh Khan मुलगा आर्यन खानचा Aryan Khan सहभाग असल्याने प्रसार माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरले. मात्र या पार्टीवर कारवाई दरम्यान NCB अधिकाऱ्यांसोबत भाजपचा पदाधिकारी मनीष भानुशाली आणि के.पी गोसावी हे असल्याचे निदर्शनास येताच मंत्री नवाब मलिक यांनी प्रकरण उचलून धरले.

ही कारवाई बोगस असून NCB अधिकार्यांनी फर्जीवाडा कारवाई केल्याचा आरोप करत नवाब मलिकांनी Nawab Malik वानखडेंच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. याला NCB कडून ही पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. मात्र भानुशाली व के.पी गोसावीच्या कारवाईतील सहभागाबाबत बोलणं टाळलं, या दोघांसह ९ जण या प्रकरणात पंच होते. मात्र के. पी गोसावी यांचा एका सेल्फीने वानखडेंच्या अडचणी वाढवल्या.

गोसावी यांचा सेल्फी सोशल मिडियावर वायरल झाल्यानंतर भानुषाली यांच्यावरचा मोर्चा माध्यमांनी गोसावीवर वळवला. त्यानंतर गोसावी यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची मालिका नवाब मलिक यांनी बाहेर काढली. तसेच गोसावी एक पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे समोर आल्याने माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलयाने समीर वानखडे या़च्या अडचणीत वाढ झाल्या...

अशातच नवाब मलिक यांनी वानखडेंबाबतचे पुरावे बाहेर काढत जोरदार आरोप केले. नेमकं त्याच वेळी गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलने पुढे येऊन वानखडेच्या कारवाईची पोलखोल केली. वानखडे यांनी गुन्ह्याच्या रात्री कारवाईची माहिती नसताना आपल्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, इतकचं काय तर या कारवाईत २५ कोटीची डिल ठरवण्यात आली असून ८ कोटी वानखडे यांना मिळणार होते व १० कोटी गोसावी यांना मिळणार असल्याचे संभाषण झाल्याचे सांगितले. तसेच यात ५० लाखांची रोकड गोसावी यांना देऊन त्यातील ३८ लाख सँम नावाच्या व्यक्तीला दिल्याचा व्हिडिओ प्रभाकर यांनी वायरल केला.

हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड वायरल झाला. अशातच नवाब मलिक यांनीही ट्विटहून वानखडे यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो व जन्म दाखला वायरल केला. या दाखल्यात वानखडे यांचे नाव दाऊद वानखडे असल्याचे लिहिले होते. मात्र या सर्व आरोपाचे समीर वानखडे यांनी खंडन करत, अधिकृत पत्र काढत सविस्तर स्व:तची महिती दिली. तसेच कुणीतरी आपल्याला खोटया गुन्ह्यात अडकवू पहात असून आपल्यावर कारवाई नकरण्याचे पत्र आयुक्तांना दिले. या पूर्वी देखील वानखडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रा पोलिस महासंचालक आणि आयुक्तांना लिहिले होते.

एकंदरीत वानखडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाबाबत वानखडे यांनी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचं ठरवलं आहेे. तर दुुसरीकडे नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचं सांगितलं आहे. तर तिसरीकडे कारवाई न करण्याबाबत आयुक्तांनापत्र लिहिल्याने आणखी घोळ घातला आहे. मात्र पोलिसांनीही आता या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. प्रभाकर साईल यांनी आज सह पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या सहार पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहे. या पूर्वीही साईलने त्याच्या व्हिडिओत वानखडे याच्यापासून आपल्याला व कुटुंबियांना धोका असल्याचे सांगत वानखडेंची भिती वाटते असे आरोप केले होते. साईलचे हे आरोप गंभीर असल्याने पोलिसांनीही याकडे लक्ष केंद्रीत केले आहेत. म्हणूनच की काय मुंबई पोलिसांच्या कारवाईच्या भितीने वानखडे यांनी आयुक्तांना पत्र लिहित कारवाई न करण्याची विनंती केली असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com