सचिन जाधव
पुणे - राज्यातील ४ महिला आमदारांची फसवणूक झाल्याची घटना पुण्यात (Pune)उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुण्यातील पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलीस आता त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
पुण्यातील भाजप (BJP)आमदार माधुरी मिसाळ,आमदार श्वेता महाले,आमदार मेघना बोर्डीकर,आमदार देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आधी महिला आमदारांनी सायबरला तक्रार दिली होती मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग केला. त्यानंतर पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील पाहा -
आई आजारी असल्याचे कारण देत एका अज्ञात इसमानी या महिला आमदारांना मदत मागितली होती. त्यानंतर या महिला आमदारांनी मदत म्हणून रक्कम ऑनलाइन माध्यमातून दिली म्हणून दिली देखील होती. मात्र नंतर तो फेक कॉल होता असं समजल.यातील आमदार माधुरी मिसाळ यांनी गुगल पे ३ हजार ४०० रुपये दिले होती बाकी आमदारांनीही अशीच काही रक्कम पाठवली होती.हे पैसे पाठवल्यानंतर या सगळ्या महिला आमदारांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.या चारही आमदारांनी तक्रार केली अन नंतर गुन्हा दाखल करण्यात आला.आता याप्रकरणी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.
आई आजारी असल्याचे सांगत मुकेश राठोड नावाच्या तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आमदारांनीही मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून दिली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. मुकेश राठोड असे आरोपीचे नाव आहे.