Pune: चोरीसाठी अनेक अंडरवेअरचा वापर; 38 मोबाईल चोरणारा गजाआड
Pune: चोरीसाठी अनेक अंडरवेअरचा वापर; 38 मोबाईल चोरणारा गजाआड  Saam TV
मुंबई/पुणे

Pune: चोरीसाठी अनेक अंडरवेअरचा वापर; 38 मोबाईल चोरणारा गजाआड

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : पुण्यातील गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुण्यातून एका मोबाइल चोराला अटक केली आहे. हा चोर म्हणजे अंडरवेअर गॅंगचा साथीदार आहे, आता तुम्ही विचार कराल अंडरवेअर गॅंग ही काय भानगड आहे? तर मोबाईल चोरीसाठी या गॅंग चे साथीदार खिसे असलेल्या विशेष अंडरवेअर वापरतात जेणेकरुन एकापेक्षा जास्त मोबाईल एकाच वेळी चोरी करता येतील, आरोपी हा मूळचा आंध्र प्रदेशातील रहिवासी असून त्याच्या टोळी महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.

पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे. नागेश आप्पाना असं अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय मोबाइल चोरट्याचं नाव आहे, पोलिसांनी आरोपीकडून 38 महागडे मोबाइल फोन आणि ईर्टीगा कार जप्त केली आहे. आरोपी आपल्या टोळीसह हैदराबादहून पुण्यात गाडीने येत असे. पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत आरोपी प्रवाशांचे मोाबाइल चोरी करत असे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपींचा हा उद्योग सुरू होता. संबंधित मोबाइल चोरटे पीएमपीएल बसमधील प्रवाशांचे मोबाइल चोरण्यासाठी खास अंडरवेअरचा वापर करत होते. गर्दीत प्रवाशाचा मोबाइल लंपास केल्यानंतर तो मोबाइल चोरटा आपल्या अंडरवेअरमध्ये लपवत असायचे. त्यामुळे त्यांची झाडा झडती घेतली तरी मोबाइल हाती लागत नव्हते. यापूर्वी आरोपीवर पुण्यातील भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे, या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT